Home Maharashtra गणराज्य दिनानिमित्त उपजिल्हा रूग्णालयात विशेष कार्यक्रम… 

गणराज्य दिनानिमित्त उपजिल्हा रूग्णालयात विशेष कार्यक्रम… 

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादिका 

       उपजिल्हा रुग्णालय मूल येथे 77 वा गणराज्य दिन उपजिल्हा रुग्णालयात विशेष उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. 

      वैद्यकिय अधिक्षक डॉ.बंडू रामटेके यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला व मानवंदना देण्यात आली.

         येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.तिरथ उराडे यांनी खास उपजिल्हा रूग्णालयाकरीता भेट दिलेल्या दुर्मिळ तैलचित्र ज्यामध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे डॉ.राजेंद्र प्रसाद यांना संविधान सुपूर्द करीत असतानाचे ऐतिहासिक प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. 

        वैद्यकीय अधिक्षक डॉ.बंडू रामटेके यांनी संविधानातील नागरिकांचे कर्तव्य समजावून सांगितले व प्रत्येक भारतीय नागरिकाने आपले कर्तव्य काटेकोरपणे बजावल्यास भारत देश समृध्द होईल अशी ग्वाही दिली.

          सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या रुग्णालयातून उच्च दर्जाच्या सेवा प्रदान कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.

        उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय असंसर्ग कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत असलेल्या अधिपरिचारिका श्रीमती विजया शिवणकर यांंचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्धल व जिल्हास्तरावर गणराज्यदिनी सत्कार करण्यात आला.त्याबद्दल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.बंडू रामटेके यांनी सन्मान करून अभिनंदन केले.

         डॉ.तिरथ उराडे वैद्यकीय अधिकारी यांनी भारतीय नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासून समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. 

        वैद्यकीय अधिकारी डॉ. देवतळे यांनी भारतीय नागरिकांनी संविधानातील समतेचे तत्व आत्मसात करून समाजात सामाजीक समता प्रस्थापित करावी व देशाची प्रगती साधावी असे विचार मांडले. 

          डॉ.देवेंद्र लाडे यांनी देशातील नागरिकांमध्ये बंधुभाव वृद्धिंगत झाल्याशिवाय समता,स्वातंत्र्य,न्याय ही लोकशाहीची मूलभूत तत्वे दृढ होणार नाहीत असे विचार व्यक्त केले.

        राष्ट्रीय अंससर्गिक विभाग मुलच्या समुपदेशक ममता शेंडे यांनी तंबाखुमुक्त भारत अभियान अंतर्गत सर्वांना शपथ दिली.कुष्ठरोग तंत्रज्ञ श्री.रंगारी यांनी कुष्ठरोग मुक्त भारत बनविणे बाबत शपथ दिली.

        डॉ.परचाके यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन समुपदेशक श्रीमती ममता शेंडे यांनी केले.