बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी..
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातातंर्गत दुर्दैवी निधन झाल्याची बातमी आज सकाळी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थावर आणि इलेक्ट्रॉनिक मिडियावर झळकताच अनेकांना धक्का बसला.
अशा अतिशय दुःखद घटना प्रसंगी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना अश्रू अनावर आले आणि ते ढसाढसा रडले असल्याचा हृदयद्रावक प्रसंग अनुभवायला आला….
आज दिनांक २८ जानेवारी २०२६ ला सकाळी मुंबईहून बारामतीला जाणाऱ्या चार्टर्ड लिअरजेट 45 विमानात त्यांनी प्रवास केला.
बारामती जवळ विमानात बिघाड झाल्याने विमान कोसळलं आणि त्यांचा विमान अपघातातंर्गत दुर्दैवी मृत्यू झाला.विमानात त्यांच्यासह एकूण ५ लोक होते.त्यातील सर्व प्रवाशांचा बचाव करणे शक्य झाले नाही.उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांच्या अपघात मृत्यू मुळे संपूर्ण राज्यात शोकाकळा पसारलेली आहे.
महाराष्ट्र शासनाने 3 दिवसांचा शोक ठेवला असल्याने शासकीय व निमशासकीय कार्यालयातील राष्ट्रीय ध्वज त्यांच्या सन्मानार्थ अर्ध्यावर राहणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शासकीय सुट्टी जाहीर केली होती.यामुळे राज्यातील शाळा आणि सरकारी कार्यालये आज बंद ठेवण्यात आली होती.
गुरुवार दिनांक 29/01/2026 सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यविधी होणार आहे. मुख्यमंत्री,मंत्री,खासदार,आमदार,अनेक नेत्यांनी आणि केंद्रीय नेत्यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे आणि अतिशय जड अंतःकरणाने श्रद्धांजली वाहिली आहे.
तद्वतच अनेक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या कार्याची आठवण करीत श्रद्धांजली वाहिली आहे.उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांचा अपघातातंर्गत मृत्यू महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणासाठी मोठा धक्का मानला जात आहे.



