Home Social पेठ इतबारपूर ग्रामपंचायतच्या दुर्लक्षितपणा मुळे नाल्या तुडुंब, सर्वत्र दुर्गंधी,आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर… 

पेठ इतबारपूर ग्रामपंचायतच्या दुर्लक्षितपणा मुळे नाल्या तुडुंब, सर्वत्र दुर्गंधी,आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर… 

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

          सामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे गावात रोगराई पसरू नये यासाठी अग्रक्रमाने काळजी घेणे हे प्रशासन चे आद्य कर्तव्य आहे मात्र यासाठी कोणतेही कार्य न करता नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही. ग्रामपंचायत पेठ इतबारपूर प्रशासन याबाबत उदासिन असल्याचे दिसत आहेत.

           गावातील नाल्या तुडुंब भरल्या असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. अनेक दिवसापासून नाल्या स्वच्छ न केल्याने नागरिकांना त्रासदायक झाले आहे.यांसह अनेक नाल्या नादुरुस्त आहेत. पाणी रस्त्यावर वाहत आहे.गावातील नागरिक ग्रामपंचायत प्रशासन यांना वेळोवेळी अवगत करत असतानाही केवळ दुर्लक्ष करत असल्याने गावात रोगराई पसरण्याचे संकेत दिसत आहे.

            प्रसासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिक संतप्त झाले असून याबाबत पंचायत समिती अधिकऱ्यांना सूचित केले आहे. मात्र कोणताही अधिकारी व प्रशासन लक्ष देत नसल्याने आंदोलनाच्या तयारीत आहेत.

            ग्रामपंचायत मधिल सचिव नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसून उडवा उडवीची उत्तरे देत आहेत यासाठी ग्रामस्थ वरिष्ठ अधिकऱ्यांची भेट घेणार असून, तातडीने गावातील नाल्या दुरुस्त करवून तसेच घाण स्वच्छ करण्याची मागणी पेठ इतबारपूर येथिल सतिश भोरखडे, दिलीप भोरखडे तथा नागरिकांनी केली आहे.