युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार नजिकच्या वडूरा पूर्णा येथिल जि.प. माध्यमिक शाळेत 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाबूराव नितनवरे तर प्रमुख अतिथी उपसरपंच सौ प्रणिताताई नांदणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकृष्ण नांदणे उपस्थित होते.
शाळेतील शिक्षक विजय मकेश्वर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी या महामानवांच्या प्रतिमा भेट दिल्या त्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करून पूजन करण्यात आले. तर उपस्थित महिला वर्गांनी ध्वज स्तंभाचे पूजन केले व त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका वणमालाताई शेवतकर यांनी ध्वजारोहण करुन उपस्थित मान्यवरांना असाक्षरतेची शपथ देण्यात आली.
तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार देशभक्तीपर गितावर विद्यार्थ्यांनी कवायतीचे प्रात्यक्षिक सादर केले.शाळेच्या वतीने शिवकुमार पेढेकर व देवानंद भोरखडे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यानंतर गिरीजा शंकर विद्यालय वडूरा येथे शाळेच्या विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. विजय मकेश्वर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



