दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : श्री गणेश जयंतीनिमित्त गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ रोजी आळंदीतील लक्षशांती गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या पावन दिनानिमित्त दुपारी ठीक १२ वाजता श्री गणेशाची महाआरती संपन्न होणार असून त्यानंतर दुपारी १२ ते २ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांची कीर्तन सेवा होणार असून या कीर्तनातून भक्ती, संस्कार आणि सदाचाराचा संदेश दिला जाणार आहे.
गणरायाच्या जन्मोत्सवानिमित्त दिवसभर मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून जाणार आहे.
या धार्मिक सोहळ्यास आळंदी व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री गणेशाचा कृपाशीर्वाद घ्यावा, असे आवाहन सचिन लक्ष्मण येळवंडे यांनी केले आहे. गणेश जयंतीनिमित्त श्रद्धा, भक्ती आणि एकोप्याचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम भाविकांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे.



