शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
ग्रामपंचायत सावरी (बीड) कडून आशा वर्कर यांना आरोग्य तपासणी संबंधातील साहित्य वाटप करण्यात आले.
आशा वर्कर वॉर्ड न.०१ उज्ज्वला मेश्राम,वॉर्ड न.०२ प्रिया हीवंज,वॉर्ड न.०३ राजेश्री हरडे यांना बी पी ऑपरेटर,शुगर मशीन,थर्मामीटर,वजन काटा, झोळी इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.
वाटप करताना ग्रामपंचायत सावरी (बीड) येथील सरपंच लोकनाथ रामटेके,उपसरपंच निखिल डोईजड,सदस्य दिलीप मोटघरे,सदस्य रामदास खामणकार,आशिष घानोडे,सदस्या सुरेखा शेंबेकर,सदस्या अर्चना हनवते,किरण मेश्राम,सदस्या नलू शेंबडे तसेच ग्रामपंचायत अधिकारी निखिल सहारे उपस्थित होते.



