Home क्रीडा ग्रामगीता महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन “युवास्पंदन-2025-26″ची क्रीडा स्पर्धेने सुरुवात…

ग्रामगीता महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन “युवास्पंदन-2025-26″ची क्रीडा स्पर्धेने सुरुवात…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी

      ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन, “युवास्पंदन-2025-26” ची सुरुवात विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करून करण्यात आली.या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये दिनांक 21 व 22 जानेवारी 2026, पुढील दोन दिवस विविध सांस्कृतिक व अंतर्गत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 

        या विविध क्रीडा स्पर्धांची सुरुवात प्रथमता क्रिकेट स्पर्धेने,महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ. सुनंदा आस्वले व प्रा. डॉ. संदीप सातव, संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख, प्रा.डॉ.प्रणाली टेंभुर्णे, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख,यांच्या हस्ते पूजा करून व नारळ फोडून महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात करण्यात आली.

         याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ. सुनंदा आस्वले यांनी आपल्या मार्गदर्शनात,अशा विविध स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक,मानसिक विकास होतो व तसेच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते असे,त्यांनी सांगितले व सर्व खेळाडू स्पर्धकांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.

           तसेच समस्त चिमुरवासीयांनी व विद्यार्थ्यांनी या वार्षिक स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा,असे त्यांनी सांगितले.

        याप्रसंगी क्रिकेट,कबड्डी,व्हॉलीबॉल,दौड स्पर्धा,लगोरी इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

       महाविद्यालयातील प्रा. डॉ.हुमेश्वर आनंदे,प्रा.डॉ.निलेश ठवकर,प्रा.डॉ.मृणाल वराडे,प्रा.डॉ.वरदा खटी,प्रा.डॉ.सुमेध वावरे,प्रा. कु.प्रज्ञा खोब्रागडे,प्रा.कु. सरताज शेख,प्रा.डॉ.नागेश ढोरे,प्रा.डॉ.युवराज बोधे,प्रा.रोहित चांदेकर,प्रा.विवेक माणिक,प्रा.समीर भेलावे,कैलास मेश्राम,संजय दुधनकर,मुकेश घटे,योगेश सोनटक्के,कमलेश दडमल, तेजराम सोनवणे,केदार कापसे,मेहमूद पठान,हितेश डेंगरे,निकेश कुंनघाटकर,संजय खोब्रागडे,मनसाराम घोडमारे, निखिल भालेराव,श्रीराम खाडे व इतर सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

         हे स्नेहसंमेलन यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मेहनत घेत आहेत.