सैय्यद जाकीर
उपसंपादक
महानगरपालिका निवडणूकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला घवघवीत यश मिळाले असल्याने हिंगणघाट शहरासह ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे.
राज्यात झालेल्या 29 महानगरपालिकेचा निवडणूक निकाल नुकताच जाहीर झालाय.या निकालातंर्गत महायुतीचा विजय संपूर्ण राज्यात दिसून आलाय.
मुंबई महानगरपालीकेत किंगमेकर महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री व अनाथाचे नाथ म्हणून ज्यांची ओळख आहे,असे ना.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाने ठाणे,मुंबई महानगरपालीकेत घवघवित यश मिळवले आहे.
राज्यातील इतर महानगर पालिकामध्येही शिवसेना शिंदे पक्षाचे नगरसेवक मोठ्या संखेने निवडून आले आहेत.
महानगरपालिका निवडणूकीनुसार शिवसेना शिंदे पक्ष हा राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आलाय.
यामुळे हिंगणघाट शहरासह तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी,”शिवसेना जिंदाबाद,असे नारे शिवसैनिकांनी या प्रसंगी दिले व महानगरपालिकेतील विजयाबद्दल फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
याचा आंनद हींगन घाट क्षेत्रा मध्ये महिला व पुरुष शिव सैनी काननी बैंड व फटाके वाजवुन आनंद व्यक्त केला आहे.
तद्वतच पुढील निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असाच घवघवीत विजय मिळत राहील असा सद्भावना त्यांच्या द्वारे पक्षप्रमुखांना देण्यात आल्या.
या आनंदात शिवसेनेचे सतीश चौधरी,विकास हांडे,सोनू लांजेवार,प्रतीक चाफले,सतीश तांबोडी,वंदना हांडे,सुनीता तांबोडी,लक्ष्मी बाई लोहकरे,तेजस्विनी अराडे,कांता झोरे,यांच्यासह बरेच शिवसैनीक मोठ्या संखेनें सहभागी झाले होते.



