ज्या देशाचा प्रधानमंत्रीच एखाद्या दंगलीचा नैतिक जबाबदार असेल.देशाचा गृहमंत्रीच खुनी आणि तडीपार असेल, खुलेआम संसदेत तो म्हणत असेल की, देश का प्रधानमंत्री और गृहमंत्री RSS वाला है. क्या कर लोगे…?
त्या देशाचे व जनतेचे काय भवीतव्य असेल…..?
जनतेला दोष देऊन उपयोग नाही……
“अत्त दीप भव ( तुझा तू दीप हो ).” :- भगवान बुद्ध
” लोकशाहीत प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून समाजपरीक्षण करावे.” :- सॉक्रेटीस ( ग्रीक तत्वज्ञ )
” बुरा देखन मैं चला, बुरा मिला ना कोय……
जब दिल खोजा अपना, मुझसा बुरा ना कोय.”:- संत कबीर
“शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका :- छ. शिवाजी महाराज
“लोकशाहीत सर्वसामान्य जनता रांगत्या बाळासारखी निरागस असते….” :- रुसो ( फ्रेंच तत्वज्ञ )
” बामणीकावा आहे अकलेचा खबरदार, हे विसरून तुम्हां नाही चालणार”…. :- म. ज्योतीराव फुले
” गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. ” :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर(राज्यघटनेचे शिल्पकार )
” देव देवळात नसून, देव माणसात आहे :- संत गाडगेबाबा
” भीमा तुझ्या मताचे जर पाच लोकं असते, तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते.” :- वामनदादा कर्डक
” ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून कामगारांच्या हातावर तरलेली आहे.” :- अण्णा भाऊ साठे
वरील प्रकारचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जागतिक सर्व आणि इतर अनेक तत्व वेत्ते आणि महापुरुष हे सर्व एका बाजूला………
जे निसर्गनियमावर आधारित असलेल्या स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या लोकशाही आणि मानवतावादी ( विज्ञानवादी + विवेकवादी = मानवतावादी) या मूल्यांच्या अविष्कारितेसाठी क्रांती करणारे क्रांतिकारक ( ज्यांचे आदर्श स्मारक व पुतळे संबंध जगात दिसतील ) एका बाजूला…….
तर……..
दुसऱ्या बाजूला निसर्ग नियमांच्या विरुध्द असलेले, प्रतीक्रांतीची लाट निर्माण करणारे, ज्यांना क्रांतिकारकांच्या क्रांत्या अगदी काळजाच्या कपारीत घुसून जखमी करणारे, जिव्हारी लागून अस्वस्थ होणारे, चिडून पण शांत चित्ताने आपल्या साम, दाम, दंड आणि भेदाच्या षडयंत्राच्या जोरावर “क्रांतीला नव्हे ” तर क्रांतिकारकांना संपविण्याचे कट रचणारे………
आर्य लोकं ( ज्यांचा स्वतःचा जगाच्या पाठीवर सांस्कृतिकदृष्ट्या एकही देश नाही.) म्हणजे आजचे ब्राम्हण्य वृत्तीचे ब्राम्हण जे बाहेरून येऊन आपल्या मूळ भारतीय सिंधु सुसंस्कृतीवर आक्रमण करून इथे स्थायिक झालेले साढेतीन टक्केवाले जे पुढे मनुवादी आणि RSS वाले म्हणून सिद्ध झालेले……
आर्यचाणक्य उर्फ विष्णूगुप्त कौटील्य…
पुष्यमित्र श्युंग…
कृष्णाजी भास्कर कुलकर्णी……
संत तुकारामाचे खुनी…
छ. शाहू महाराजांच्या आरक्षणाला विरोध करणारे पुण्याचे शेंडी व जाणवेधारी ब्राम्हण…
गोळवलकर, हेडगेवार, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवैरी सावरकर, मोहन भागवत, मोदी,शहा, फडणवीस यांच्या सोबत केंद्रात आणि विविध राज्यातील सचीवालयात असणारे सर्व……..
प्रशासकीय सचिव ( IAS, IPS , IRS, IFS )
वरील दोन प्रकारच्या संविधानवादी आणि संविधानविरोधी शक्तीत गेल्या हजारो वर्षांपासून संघर्ष चालू आहे. ज्याला आपण क्रांती आणि प्रतीक्रांती म्हणतो.
याच क्रांती आणि प्रतीक्रांतीच्या संघर्षाची अतिरेकी लाट आज 2026 ते 2029 च्या या अडीच वर्षात येऊन ठेपलेली आहे……!
याची कल्पना किती दूरदृष्टी वाल्यांना असेल, याची मला माहिती नाही. परंतू , बोटावर मोजता येणाऱ्या आचारवंतांना याची भयान कल्पना व जाणीव निश्चितच आहे. म्हणून ते शांत किंवा गप्प कधीच बसू शकत नाहीत. कारण त्यांना त्यांच्यावर असलेल्या त्यांच्या आदर्शाच्या उपकाराचे कर्ज फेडण्याची संधी शोधत असतात. जी की त्यांना आता मिळालेली आहे.
आपल्या पुर्वजांनी विशेष करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यशास्त्राच्या व्याख्येनुसार राजकीय सिंद्धांतावर आधारित दबावगट त्यांनंतर विविध……………
“लोककल्याणकारी” राजकीय पक्षांच्या निर्मितीसाठी संविधानातून मार्गदर्शक तत्वे घालून दिलेली होती. त्याची सुरवात सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः पासून केली होती. उदाहरणार्थ शेड्युल्ड कास्ट फेडरेशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही कल्पना……..
परंतू आज ( 2026 मध्ये ) सर्वच राजकीय पक्षांचे राजकारण हे समाजकारणविरहित परंतू साम, दाम, दंड आणि भेद यावर आधारलेल्या षडयंत्रावर ” जाती व धर्मभेदावर ” आधारित राजकारण करून येनकेन प्रकारे……..
राजकीय सत्ता हस्तगत करण्याचा मार्ग निवडला आहे.त्यामुळे आज आमची राज्ये आणि संपूर्ण देश सर्वच क्षेत्रातील अपयशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे.
शिक्षण क्षेत्र (विज्ञानवादा ऐवजी धर्मावर आधारित आणि खाजगीकरण), मंदिरे, विहारे निर्माण करून लोकांनी सदविचारी न बनता आपापल्या पुतळ्याला हार अर्पण करून राजकीय विभूतीपूजा पसरवणे. मादक पदार्थांची भरमसाठ निर्मिती आणि त्याचे सुलभ परवाने देणे, म्हणजे जनतेला मूलभूत हक्क समजू नये. समजले तरी त्यांनी उठाव करू नये. सर्व जनता व्यवस्थेची गुलाम म्हणूनच राहिली पाहिजे. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न या देशात चालू आहेत. अशा बिकट प्रसंगी संविधानाचा लाभ घेऊन साडी, गाडी आणि माडीत बसून ढेकर देऊन ढेरीवरून हात फिरवीणारी औलाद (ज्यांना ही व्यवस्था काय करते ते सर्व समजते परंतू गप्प राहण्यासाठी ही व्यवस्था यांना लाभ मिळवून देते. म्हणून हे गप्प बसतात) गप्प बसते म्हणून या मनुवाद्याचे फावते…..!
म्हणून या प्रतीक्रांतीच्या शेवटच्या अतिरेकी लाटेत………
संविधाननिष्ठ भारतीय नागरिकांनी आपल्या मूलभूत अधिकारात सर्वोच्च स्थानी असलेल्या…….
मताधिकाराचे संरक्षण कोणत्याही विरोधी राजकीय पक्षांच्या सहकार्यांची अपेक्षा न करता स्वबळावर रस्त्यावर उतरून येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी……..*
EVM म्हणजे आजच्या मनुस्मृतीला कायमचे गाडण्यासाठी सज्ज व्हा……
ही रस्त्यावरची लढाई जिंकण्यासाठीच लढावी लागेल………..
ही शेवटचीच संधी आपल्याला असेल……
शेवटी लोकांची ईच्छाच लोकशाहीत महत्वाची असते. ना CJI, ना राष्ट्रपती, ना प्रधानमंत्री, ना माध्यमे, केवळ आणि केवळ…….
जनता की अदालतच सर्वोच्च स्थानी…..!
“एक मुलगा मुलगी पहायला गेला. मुलाने आणि त्याच्यासोबतच्या आई – वडील आणि नातेवाईकांनी मुलीला व तीच्या आई- वडील आणि नातेवाईकांना सांगितले की, मुलाला मोठी नोकरी, शेती आहे, शहरात बंगला आहे, मोटार गाड्या आहेत. कशाचीच कमी नाही. ही मुलगी आम्हांला पसंद आहे. आम्हाला हुंडा नको पण मुलगी आम्हांला द्या. अशी विनवणी आणि भावनिक साद व जबरदस्ती ( ब्लॅकमेल ) ते करू लागले.
तेंव्हा मुलीच्या आईवडिलांनी व मुलीने स्वतः हे स्थळ ठोकरले. हे ठोकरत असताना मुलीने एकच प्रश्न केला,” तुमच्याकडे सर्वप्रकारची संपत्ती आहे. सात पिढ्यापुरेल एवढी संपत्ती आहे असे म्हणता. पण तुमच्या मुलात ” चारित्र्यच ” नाही. त्याचे काय……?
असे म्हणून मुलीनेच ते स्थळ नाकारले……!
अशीच अवस्था आमची या व्यवस्थेने केलेली आहे. आजपर्यंत यांनी आमच्यावर EVM लादली. आता तिच्यात चारित्र्यच नसेल तर ( EVM चारित्र्य नसलेली उदाहरणे पुढीलप्रमाणे, लोकसभा 2024 च्या निवडणूकित मनसे उमेदवाराच्या घरात, 5 मतदार असताना त्या उमेदवाराला तीनच मते पडणे, सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावकऱ्यांना बॅलेट पेपरवर दोबारा मतदान घेण्याचा प्रयोग करू न देणे, नालासोपारा येथे भाजपच्या नेत्याला विनोद तावडेला नोटांची बंडले वाटताना रंगेहात पकडून सुद्धा त्यावर कार्यवाही न होणे, घरोघरी जाऊन पैश्याचे वाटप करणे, वेगळ्या EVM वर मतदान घेणे आणि मतमोजणीला सेम कोड असलेली दुसरीच मशीन आणणे, मतमोजणीवेळी अचानक मतमोजणी थांबवणे, मतदानाच्या कितीही तक्रारी आल्या तरी त्यांना निवडणूक आयोगाने व सर्वोच न्यायालयाने त्यांना केराची टोपली दाखवणे, इतर जिल्ह्यातून बोगस मतदार आणून त्यांचे मतदान कार्ड आधीच बनवून घेणे, एखादा मतदार जर 5 वाजेच्या नन्तर मतदानाला गेला तर त्याच्या नावाचे मतदान आधीच कुणीतरी केलेले असणे, जगातून सर्वच लोकशाहीवादी देशातून EVM कधीच हद्दपार झालेले असताना आमच्या व्यवस्थेचा EVM साठी अट्टाहास का?) ते आम्ही का स्वीकारावं…….?
म्हणूनच आता…….
EVM मनुस्मृती हटाव…….
लोकशाही बचाव…….
कारण, शेवटी पाच वर्षातून एकच दिवस तर आम्हांला या लोकशाही प्रक्रियेत सामील होण्याची संधी मिळत असेल. ती ही आम्ही या व्यवस्थेला आणि EVM ला हिरावून कसे घेऊ देऊ…..?
म्हणूनच, हे आवाहन…..


