शेतकरी मजूर शेतात कष्ट करतो,उन्हात भाजतो,पावसात भिजतो,थंडीत कुडकुडतो.
कामगार कारखान्यात कष्ट करतो, राब राब राबतो,
कर्मचारी कंपनीत राबतो,ओव्हरटाईम ड्युटी करतो.
क्लास फोर थ्री कर्मचारी हे अधिकारी सांगतील ती कामे करतात,शारीरिक श्रम करतात,पण कष्ट करत नाहीत.कष्ट करतात ते शेतकरी ,शेतमजूर आणि कारखान्यातील कामगार.
शेतकरी ,शेतमजूर,कामगार, क्लास फोर आणि थ्री कर्मचारी तसेच अधिकारी हे सारे श्रमिकच,परंतु अधिकारी हे बुद्धीचा वापर करतात आणि बाकीचे सामाजिक वर्ग हे बुद्धीचा वापर करीत नाहीत,तर ते केवळ शारीरिक श्रम करतात.सावलीत काम करणारे ते कर्मचारी अन उघड्यावर काम करणारे तेही श्रमिकच पण कष्टकरी वर्ग होय.
शेतकरी,मजूर,कामगार,कर्मचारी,अधिकारी हे सारे श्रमिकच,यातील कुणी शारीरिक तर कुणी बुद्धीचे श्रम करतात,म्हणजे श्रमिकांच दोन प्रकार,
1 शारीरिक श्रम करणारे…
2 बुद्धीचे श्रम करणारे (अधिकारी)….
शेवटी हे सारे श्रमिक हे परावलंबीच.आणि नोकरच.नोकर म्हणजे गुलामच.कारण या सर्वांना मालक असतो.त्याच्या निर्णयानुसार आणि इशाऱ्यावर हे सारे श्रमिक आपापली नेमून दिलेली कामे करीत असतात.जसे की,शेतकऱ्यांचा मालक हा जमीनदार,मजुरांचा मालक शेतकरी,कामगारांचा मालक कारखानदार,कर्मचाऱ्यांचा मालक अधिकारी,अधिकाऱ्यांचा मालक राजकीय पुढारी किंवा सत्ताधारी ( सभापती,मंत्री,मुख्यमंत्री,प्रधानमंत्री ).
सारे श्रमिक हे नोकरच.सारे नोकर हे गुलामच.आणि सारे जमीनदार ,कारखानदार,सभापती,मंत्री हे मालक.
याचा अर्थ हे सामाजिक स्तर आणि त्यांचे संबंध पाहता ही व्यवस्था म्हणजे मालक आणि गुलामीची व्यवस्था होय.गुलामी याचा अर्थ बुद्धी असूनही ती मालकाकडे गहन ठेवणे,मजबुरी,लाचारी,परावलंबन, स्वाभिमान शून्य असे जीवन म्हणजे गुलामी.आणि मालक याचा अर्थ सत्ता संपती प्रतिष्ठा असलेले जीवन.
निर्णय घेण्याची ताकद असलेले जीवन,मनाचा राजा म्हणजे मालक.मालक हा मनाचा आणि बुद्धीचा पण मालकच असतो,सत्ता संपत्तीचा पण मालक असतो.जो ऐतखाऊ असतो.श्रम कष्ट करीत नाही.जो श्रमाची चोरी करतो,श्रमिकांचा वेळ जबरदस्ती वापरतो.या शोषित व्यवस्थेचा मालक फायदा घेतो.शोषणावर आधारित या आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेत मालक हा स्थानिकांचे श्रम आणि वेळ यांची चोरी करतो.त्यांच्या मजबुरीचा फायदा घेतो.
अधिकारी बुद्धीचे काम करीत असले तरी शेवटी ते मजबरच असतात,म्हणून मालक त्यांच्या बुद्धीचा आणि श्रमाचा गैरफायदा घेतात.अधिकाऱ्यांना फक्त सांगकाम्या म्हणून वापरतात.श्रमिकाचे श्रम आणि अधिकाऱ्यांची बुद्धी चा गैरवापर मालकवर्ग करतोच,पण ते सारे नोकर म्हणजेच गुलाम असल्यामुळे त्यांच्या मजबुरीचा फायदा मालकवर्ग घेतो,सारे निर्णय मालक घेतो.सारे श्रमिक सांगकाम्या च असतात.या विषमतावादी व्यवस्थेत असे घडणारच.
सारे कर्मचारी ,अधिकारी,मंत्री,निवडून गेलेले लोकप्रतिनिधी हे सारे देशाचे ,देशातील जनतेचे सेवक च असतात,संविधानानुसार. पण व्यवहारात सारे सेवक नसतात.तर मालक नोकर असतात.केवळ आपले पोटभरण्यासाठीच.यांना देशाशी जनतेशी काहीच देणेघेणे नसते.
जयजवान ,जयकिसान देशासाठी नव्हे तर मज बुरी पोटी सेवा करतात.आपल्या पोटासाठी.हे वास्तव आहे.मालक नोकर सारेच जनतेसाठी किंवा देशासाठी नसून स्वतःसाठी,स्वतःच्या कुटुंबासाठी,नातेवाईकांसाठी,जातीसाठी,धर्मासाठी सेवा करतात.देशासाठी किंवा समजणतेसाठी यांची सेवा,श्रम,कष्ट,निर्णय नाहीत.
मालक,नोकर,गुलाम हे सारे सेवकच,शारीरिक बौद्धिक श्रम करतात पण ते केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी,पोटासाठीच करतात.मात्र खोटे असे सांगतात की,आम्ही देशासाठी जनतेसाठी देशाचे जनतेचे सेवक म्हणून काम करीत आहोत.
अर्थात साऱ्याच सेवकांना एकाच काठीने मारणे हे चुकीचेच होईल,म्हणून यातील काही मालक,नोकर,कष्टकरी,अधिकारी मनाचे सेवक असतील,बुद्धीचे सेवक असतील,त्यांचे मनाचे बुद्धीचे दुसरे कुणीतरी मालक नसून ते स्वतःचे स्वतःच मालक असू शकतात.म्हणून प्रामाणिकपणे ते मनाने आणि बुद्धीने देशासाठी जनतेसाठी म्हणून आपली सेवा देत आहेत.
असे बोटावर मोजण्याइतक्यांची माफी मागून मी हे लिहितो आहे.पण बहुसंख्याकांचा विचार करता प्रामाणिक माणसाला असे दिसते की,आपल्या देशातील सारेच सेवक आहेत,पण ते मनाचे नसून पोटाचे सेवक आहेत.कारण ज्यांचे मन आणि बुद्धी त्यांची असूनही या विषमतावादी व्यवस्थेमुळे आणि विचारामुळे आणि मजबुरी मुळे साऱ्यांची बुद्धी मन मालकांच्या ताब्यात गहन ठेवलेली आहे.
मालकवर्ग पण आपली बुद्धी आणि मन समतेस अर्पण न करता विषमतेकडे गहाण ठेवले आहे,म्हणून ती बुद्धी आणि मन पापी बनले आहे.थोडक्यात सांगायचे झाले तर आपण सारेच देशाचे आणि जनतेचे सेवक असलो तरी ते कर्तव्य पार न पाडता केवळ आपली सेवा आपण मन मारून पोटासाठी करीत आहोत.ही गुलामीची मानसिकता बदलण्याची खरी गरज आहे.


