रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर बस आगारात काम करणाऱ्या एका तरुणाने आगारातील परिसरातच गळफास लावून आत्महत्या केली.परंतु तरुणांनी का म्हणून आत्महत्या केली असेल? हा विषयी घटनेची उकल होणे आवश्यक आहे.
ही घटना दिनांक १७ जानेवारी शनिवारीला सकाळी ८ वाजताच्या सुमारास चिमूर आगारात उघडीस आली.सुधीर माणिक भिलकर ३८ असे आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.तो चिमूर बस आगारामध्येच कर्मचारी होता.

शनिवारी सकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास चिमूर परिसरातील झाडाला गळफास घेतला.रस्त्यालगत जात असताना उभ्या असलेल्या कान्व्हेंट बसमधील शाळेच्या विद्यार्थ्यांना ही घटना दिसताच त्यांनी तत्काळ एसटी कर्मचाऱ्यांना माहिती दिली.
त्यानंतर येथील बस आगार संबंधित कर्मचाऱ्यांनी चिमूर पोलिसांना कळवले.घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठवला.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
यावेळी चिमूर आगारातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस ताफा रुग्णालयात उपस्थित होता.पुढील तपास चिमूर पोलिस करीत आहेत.



