Home देशविदेश भारत देशात जे कांही निवडणुकीत घडते आहे, त्याचे आश्चर्य वाटण्याचे कांहीही कारण...

भारत देशात जे कांही निवडणुकीत घडते आहे, त्याचे आश्चर्य वाटण्याचे कांहीही कारण नाही……

    ज्या देशाचा प्रधानमंत्रीच एखाद्या दंगलीला नैतिक जबाबदार असतो. देशाचा गृहमंत्रीच खुनी असतो. त्या देशाचे आणि जनतेचे भवितव्य ते काय असणार आहेत……?

   आणि जनता सुद्धा त्याच लायकीची असते….!”

    उलट महापुरुषांनीच या देशात जन्म घेऊन चुका केल्या आहेत………

   का या देशाला क्रांतिकारकांनी इंग्रजांना हाकलून लावलं असेल…..?

 का डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘ भारताचे संविधान ‘ लिहिलं असेल……?

      का तथागत भगवान बुध्दांनी याच देशात जन्म घेऊन धम्माची स्थापना करावी……?

      का छ. शिवाजी महाराजांनी तलवारीच्या धारेवर हिंदवी स्वराज्य स्थापन करावे…..?

   का म. फुले दाम्पत्यांनी शिक्षणक्रांती घडवून आणली…….?

    का छ. शाहू महाराजांनी राज्यात आरक्षण लागू करून समता स्थापन केली……..?

   का ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून मनुवाद्यांचे वर्चस्व संपवले……?

   आम्हांला हे सर्व फुकट मिळाले म्हणून याची आम्हांला त्या त्या महापुरुषांच्या त्याग आणि संघर्ष व समर्पणाची किंमत अजूनही समजलेली नाही. त्यांना कधी आम्ही त्यागाच्या आचरणातून समजूनच घेऊ शकलो नाही…….

     म्हणून ही आमची अवस्था आहे. भोगा आपल्याच कर्माची फळं…….

      नाचूद्या थयथय आमच्या डोक्यावर या मनुवाद्यांना. आम्ही केवळ कविताच करत बसू , गटागटात विभागून आमचेच आमचेच घर आम्ही जाळून टाकू…….

    पुन्हा हे सर्व असह्य झाल्यावर कोणत्यातरी महापुरुषाची आम्ही वाट पहात बसू……..

   असे षंढच आम्ही……!

  केवळ तोंडातच जोर आमच्या, कृती मात्र दुसऱ्यावर अवलंबून……

    हे का घडते सर्व……?

      कारण……..

   कुत्तेको घी हजम नही होता……!

    हजारो वर्षांपासून 1947 पूर्वीपर्यंत गुलामीचे, अंधश्रद्धेचे व्यसन लागलेले केवळ 75 वर्षात संपणार आहे का…….?

         मनुवाद्यांनी आम्हांला गळ्याइतकं जरी पुरलं, तरी आम्ही म्हणणार की आमचं नाक अजूनही उघडं आहे. एवढे आम्ही षंढ, नपुसंक आणि गुलाम……..!

     “हिमालयाच्या पायथ्याशी डोकं आपटून मी माझा जीव देईन.ते रक्त पाहुन माझा समाज जागृत होईन.” :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर

       पण नाही बाबा, हा तुमचा गैरसमज होता. तेवढ्या लायकीचे आम्ही नाहीच आहोत…….

          आमच्यावर गेल्या 75 वर्षात पुन्हा एकदा या मनुवाद्यांनी पगडा केला, एवढं स्वार्थात पुन्हा जखडवलं, की त्यापुढे तुमचं सांडलेलं रक्त आम्ही बघुन तुम्हांलाच मुर्खात काढलं असतं…….

       कारण,आज 2026 मध्ये आमच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी आधुनिक मनुस्मृती म्हणजे EVM आहे. हे अनुभवातून जाणवत असताना, अजूनही आम्ही या आधुनिक मनुस्मृतीला गांभीर्याने घेतलेले नाही…….

     म्हणूनच आम्ही गुलाम होतो, आहोत आणि राहू. हेच आमचं नशीब समजून आला दिवस आम्ही कंठू………

   वरीलप्रमाणेच आमची लायकी…….!

          साढेतीन टक्केवाल्याकडून 95 टक्केवाल्यांना गुलाम बनविण्याची शक्ती केवळ मनुस्मृतीतच असल्याने हे सर्व या देशात घडते आहे…….!

      मनुवाद्यांचा धोका ओळखण्यात आम्ही (स्वतःला आंबेडकरी विचारवंत म्हणवून घेणारे, हजारो रुपये मानधन घेऊन चार भिंतीतच बोलघेवडे व्याख्यान देणारे, रस्त्यावर न उतरता) कमी पडलो. म्हणूनच लोकशाही, संविधान आणि तीची मूल्ये या देशातून हद्दपार झालेली आहे………!

टीप :- याच विचाराचा दुसरा भाग उद्याच्या भागात.

   तुमच्या मेलेल्या सदसदविवेक बुद्धीला जिवंत करण्याचा प्रयत्न करणारा… 

     अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689