Home Social छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगाव पुर्णा येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची...

छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगाव पुर्णा येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक 

         छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने राजमाता जिजाऊ साहेब यांची 428 वी व स्वामी विवेकानंद यांची 163 वी जयंती साजरी करण्यात आली. 

          अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ. रविंद्र इचे उपस्थित होते प्रमुख अतिथी डॉ. हरीश काळे तर प्रमुख मार्गदर्शक डॉ भारत कल्याणकर उपस्थित होते.

            या कार्यक्रमाचे आयोजन, प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष काळे यांनी केले यावेळी प्रा.लिल्हारे,डॉ प्रविण सदार,प्रा. चऱ्हाटे,शिक्षकेत्तर कर्मचारी,रासेयो स्वयंसेवक,विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थिती होते.