दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपच्या प्रचाराला मोठी उस्फूर्तता लाभली असून विकासाच्या मुद्द्यांवर भाजपचे उमेदवार प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र आहे. भाजपचे उमेदवार शैलजीत बनसोडे, रत्नमाला सातव, तृप्ती संतोष भरणे व सुरेंद्र पठारे यांनी संघटितपणे प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला.
“प्रभागाच्या उज्ज्वल आणि शाश्वत विकासासाठी कमळ चिन्हाला मत द्या,” असे आवाहन करत उमेदवार तृप्ती संतोष भरणे यांनी मूलभूत नागरी सुविधांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
चारही उमेदवारांनी घराघरांत जाऊन प्रचार करत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजनांचा थेट लाभ प्रभागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर नागरिकांचा विश्वास दृढ होत असल्याचे दिसून येत आहे.
भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाले होते. “विकास, पारदर्शकता आणि सक्षम नेतृत्वासाठी भाजपला संधी द्या,” असा ठाम संदेश देत प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपच्या उमेदवारांचा प्रचार निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे चित्र आहे.



