Home शैक्षणिक मतदार जनजागृती स्पर्धेत ९ विद्यार्थी विजयी… — स्वीप अंतर्गत चित्रकला व...

मतदार जनजागृती स्पर्धेत ९ विद्यार्थी विजयी… — स्वीप अंतर्गत चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा… — ७० शाळा व महाविद्यालयांचा सहभाग…

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादिका 

चंद्रपूर ११ जानेवारी – स्वीप अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे घेण्यात आलेल्या आंतर शालेय चित्रकला व आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना आयुक्त अकुनुरी नरेश यांच्या उपस्थितीत बक्षीस देण्यात आले…  

         स्वीप अंतर्गत अनेक उपक्रम चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत आहेत, यात मनपा शिक्षण विभागातर्फे आंतर शालेय चित्रकला व आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. ज्यात जवळपास ७० मनपा व खाजगी शाळा तसेच महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक शाळेत त्यांच्या स्तरावर झालेल्या स्पर्धेत ३ विजेते निवडण्यात आले होते.

              या विजेत्यांची अंतिम स्पर्धा मनपा प्रशासकीय इमारतीजवळील वाहनतळावर घेण्यात आली. चित्रकला स्पर्धेत इयत्ता १ ते ५ या गटात तुषा जाधव,आरोही सुनील महतो,भारती हर्षद पसारे या विद्यार्थिनींनी अनुक्रमे पहिला दुसरा व तिसरा क्रमांक तर इयत्ता ६ ते १० या गटात केतकी महेंद्र किन्हेकर,निर्मला मेघाराम प्रजापती, टिया मनोज दास या विद्यार्थिनींनी अनुक्रमे पहिला दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला.असरा वालीम पठाण व आदित्य आनंद टिपले यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.

          वक्तृत्व स्पर्धेत प्रथम – पवन मोटघरे,द्वितीय – गुलाब बुरोडे तर तृतीय क्रमांक विघ्नेश्वर देशमुख याने मिळविला व आयशा खोब्रागडे,राहुल गेडाम यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. निकाल घोषित होताच सर्व विजेत्यांना शालेय व महाविद्यालयीन जीवनात उपयोगी पडतील अशी बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी पथनाट्य सुद्धा सादर करण्यात आले.चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण डॉ. किरणकुमार मनुरे,डॉ.देवेंद्र बोरकुटे,प्रा.प्रमोद उरकुडे यांनी केले.      

              याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त संदीप चिद्रवार, स्वीप मोहिमेच्या पिंक अँबेसिडर प्रा.डॉ. जयश्री कापसे – गावंडे,स्वीप आयकॉन नागेश नीत, मनपा शिक्षणाधिकारी सुनील आत्राम,रोशनी तपासे तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.

चित्रकला स्पर्धा इयत्ता १ ते ५…

प्रथम – तुषा जाधव ,प्रयदर्शिनी कन्या विद्यालय,बगडखिडकी  

द्वितीय – आरोही सुनील महतो, पं. दीनदयाळ उपाध्याय प्रा. शाळा    

तृतीय – भारती हर्षद पसारे, पं. जवाहरलाल नेहरू प्रा. शाळा,मनपा      

प्रोत्साहनपर….

असरा वालीम पठाण – लोकमान्य टिळक गर्ल्स प्रा. शाळा

आदित्य आनंद टिपले – रयतवारी कॉलरी सेमी इंग्लीश शाळा

चित्रकला स्पर्धा इयत्ता ६ ते १०…

प्रथम – केतकी महेंद्र किन्हेकर,एफईएस गर्ल्स स्कूल    

द्वितीय – निर्मला मेघाराम प्रजापती,न्यू इंडिया कॉन्व्हेंट  

तृतीय – टिया मनोज दास,हिंगलाज भवानी हायस्कूल    

प्रोत्साहनपर…

राखी योगेश निंदेकर,प्रियदर्शिनी कन्या विद्यालय

कुमकुम नितेश शास्त्रकार, सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळा,बाबुपेठ

आंतर महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धा…

प्रथम – पवन मोटघरे

द्वितीय – गुलाब बुरोडे    

तृतीय – विघ्नेश्वर देशमुख

प्रोत्साहपर…

आयशा खोब्रागडे

राहुल गेडाम