Home Maharashtra ग्रामपंचायत अधिकारी व केंद्रचालक यांच्या गैरव्यवहाराची चौकशीसाठी आमरण उपोषण… — जिल्हा...

ग्रामपंचायत अधिकारी व केंद्रचालक यांच्या गैरव्यवहाराची चौकशीसाठी आमरण उपोषण… — जिल्हा परिषद समोर दि.०८ पासून आमरण उपोषण सुरू…

ऋषी सहारे 

   संपादक 

गडचिरोली – कुरखेडा गट ग्रामपंचायत धनेगांव येथील ग्रामपंचायत अधिकारी व केन्द्रचालक यांची चौकशी करण्यास दिरंगाई होत असल्यामुळे गट ग्रामपंचायत धनेगांवचे सरपंच जि.प.कार्यालय गडचिरोलीच्या समोर दि. 08/01/2026 पासून उपोषण करीत असल्याबाबत सरपंच, गट ग्रामपंचायत धनेगांव यांनी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ला दि.26/01/2025 ला कळविले होते परंतु चौकशीसाठी दिरंगाई होत असल्याने आमरण उपोषणाला साखेराचे सरपंच अनिल दळाजे,गिरोलाचे सरपंच रुपेश तुलावी,जांभळी उपसरपंच पुरुषोत्तम बावणे,निमगांवचे उपसरपंच चेतन सुरपाम इत्यादी उपोषणाला बसले आहेत. 

          गट ग्रामपंचायत धनेगांव येथील ग्रामपंचायत अधिकारी व केन्द्रचालक यांनी ग्रामपंचायत कमेटीला बाजुला ठेवुन नियोजन,नियुक्त्या, कामाचे टेंडर व आर्थिक गैरव्यवहार करून प्रशासन चालवितात.या विषयी गट विकास अधिकारी, पंचायत समिती कुरखेडा यांना मौखिक व निवेदनाद्वारे वारंवार माहीती देण्यात आलेली आहे. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) जि.प.गडचिरोली याना निवेदन देण्यात आले. आणि त्या संदर्भात सुनावणी झालेली आहे.

        ग्रामपंचायत अधिकारी व केन्द्रचालक यानी गैरव्यवहार केलेले कागदपञ सुद्धा सादर करण्यात आले  तसे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प) जि.प.गडचिरोली यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती कुरखेडा याना दिनांक 14/10/2025 ला दिले. परतु कोनतीही चौकशी करणयात आलेली नाही.

          यावरून हे सिद्ध होतो की ग्रामपंचायत अधिकारी व केन्द्रचालक याना वरीष्ट अधिकाऱ्याचा पाठबळ आहे म्हणून सदर तक्रारीची सखोल चौकशी न करता त्यांना वाचविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. म्हणूनच ग्रामपंचायत अधिकारी व केन्द्रचालक याची कोणतीही संखोल चौकशी न करता उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गडचिरोली याच्याकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

        त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विकास कामे करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे कोणतेही दोष नसताना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.तरी संबंधित विषयाची पारदर्शक चौकशी होण्यासाठी संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून लवकरात लवकर चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी.

          विहीत कालावधीत कार्यवाही करून चौकशी न केल्यास जिल्हा परिषद कार्यालय गडचिरोलीच्या समोर ग्रामपंचायत अधिकारी व केन्द्रचालक याच्यावर कार्यवाही करण्यात यावे. यासाठी ग्रामपंचायत कार्यालय धनेगांवचे सरपंच जि.प.कार्यालय गडचिरोलीच्या समोर दिनांक 08/01/2026 पासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आलेली आहे.त्याच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी सरपंच संघटना जिल्हा गडचिरोली त्याच्या उपोषणाला पाठींबा जाहीर करीत आहे.