ऋषि सहारे
संपादक
आरमोरी येथील राज्य शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त व आनंद शिक्षण संस्थेच्या संस्थापक उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्त्या शालीनी बुधाजी गेडाम यांचे दि.६ जानेवारी रोज मंगळवार सायंकाळी ६:३० वा.अल्पशा आजाराने निधन झाले.
ब्रम्हपूरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.शालीनी गेडाम या प्रा.शशीकांत गेडाम व आनंद शिक्षण संस्थेचे सचिव अजय गेडाम यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी,सुना, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी १२ वा. गाढवी नदीकाठावर अंत्यसंस्कार करण्यात आले.



