शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचा सामाजिक चेतना पुरस्कार शिक्षण,सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे संजय बोधे, समता सैनिक दलाच्या माध्यमातून सामाजिक संघटन बांधणी करणारे विरेंद्र बन्सोड यांना आज रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालय चिमूर येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला.सन्मानचिन्ह,पुस्तक आणि शाल देऊन संजय बोधे आणि विरेंद्र बन्सोड यांना गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते रामदास कामडी होते.प्रमुख अतिथी म्हणून वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसिद्ध विधीज्ञ ऍड.भूपेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते हरी मेश्राम, वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे सचिव सुरेश डांगे उपस्थित होते.
याच कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अलिकडेच केलेल्या क्रीडा स्पर्धात उल्लेखनीय कामगिरीसाठी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.त्यात प्रामुख्याने प्रथम राजेंद्र बावणे या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सोनाली निकुरे,गणेश मडावी या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरण समारंभाला सामाजिक कार्यकर्ते,शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. पुरस्कार वितरण समारंभाचे प्रास्ताविक सुरेश डांगे यांनी केले. संचालन कैलाश बोरकर यांनी तर आभार रावन शेरकुरे यांनी मानले.पुरस्कार वितरण समारंभाकरिता वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान, मूकबधिर विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.



