Home आरोग्य मदर डेंटल क्लिनिकमधून गुणवत्तापूर्ण दंतसेवेचा संकल्प :- डॉ.अक्षया जगताप… — आळंदीत...

मदर डेंटल क्लिनिकमधून गुणवत्तापूर्ण दंतसेवेचा संकल्प :- डॉ.अक्षया जगताप… — आळंदीत मदर डेंटल क्लिनिकच्या लोकार्पण…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : दंत आरोग्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित करत “दंतआरोग्य ही केवळ सौंदर्याची बाब नसून एकूण आरोग्याशी निगडित महत्त्वाचा घटक आहे,” असे प्रतिपादन डॉ.अक्षया जगताप यांनी केले. 

       आळंदीत मदर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आळंदीत सुरू करण्यात आलेल्या मदर डेंटल क्लिनिकच्या लोकार्पणप्रसंगी त्या बोलत होत्या. या लोकार्पण सोहळ्यास आमदार महेश लांडगे, शरद सोनवणे, आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, माजी महापौर नितीन काळजे, उद्योजक प्रकाश पानसरे, रामशेठ जगताप, निलेश बोरचटे, नगरसेवक सोमनाथ कुऱ्हाडे, अनिकेत तापकीर, चेतन कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

      डॉ.अक्षया जगताप म्हणाल्या, “आजही अनेक नागरिक दातांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. परिणामी पुढे गंभीर आजार उद्भवू शकतात. मदर डेंटल क्लिनिकच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानासह परवडणारी, विश्वासार्ह व रुग्णकेंद्रित दंतसेवा देण्याचा आमचा संकल्प आहे.” गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्याचाही मानस त्यांनी व्यक्त केला. 

         मदर चॅरिटेबल ट्रस्ट व डॉ.अक्षया जगताप यांच्या या उपक्रमामुळे आळंदी व परिसरातील नागरिकांना दर्जेदार दंतसेवा उपलब्ध होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. प्रशांत जगताप व प्रसाद जगताप यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.