शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा चिमूर च्या वतीने भारतातील पहिल्या महिला शिक्षिका,थोर समाजसेविका, उत्तम कवियित्री,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्त्रीशिक्षण,सामाजिक समता आणि परिवर्तनासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश उपस्थित मान्यवरांनी दिला.
कार्यक्रमाला अखिल भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष वतन सहारे,सचिव सुमेध सहारे,उपाध्यक्ष आशिष राऊत,उपाध्यक्ष प्रशिक भैसारे,सहसचिव मनोज राऊत,सहकोषाध्यक्ष शेखर राऊत,तसेच दिशांत सोरदे, सचिन गेडाम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे आचरण करून समाजात शिक्षण व समानतेची चळवळ अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला.



