Home Social मुनघाटे महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती साजरी…

मुनघाटे महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती साजरी…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

     धानोरा, येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

         यावेळी महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ राजू किरमिरे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तर विशेष अतिथी म्हणून डॉ हरिष लांजेवार डॉ विणा जम्बेवार डॉ दामोधर झाडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.

             याप्रसंगी महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रा प्रशांत वाळके यांनी तर आभार डॉ प्रियंका पठाडे यांनी केले.

        यावेळी डॉ सचिन धवनकर डॉ नितेश पुण्यप्रेड्डीवार प्रा मांतेश तोंडरे डॉ प्रवीण गोहणे प्रा रणदिवे प्रा आवारी प्रा करमणकर प्रा वटक तर प्रशासकीय कर्मचारी श्री मनोज नन्नावरे श्री गणेश लांबट श्री भास्कर कायते श्री हरीश्चंद्र गोहणे श्री संदीप मानापुरे श्री बालाजी राजगडे श्री भास्कर वाढणकर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.यावेळी सांस्कृतिक विभागाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.