Home Social सहज सुचलं व्हाॅट्सअप ग्रुपच्या संयोजिकापदी चंद्रपूरच्या रंज्जू दिलीप मोडक यांची निवड तर...

सहज सुचलं व्हाॅट्सअप ग्रुपच्या संयोजिकापदी चंद्रपूरच्या रंज्जू दिलीप मोडक यांची निवड तर प्रियंका चिताडेंची राणी सखी मंचच्या संयोजिकापदी नियुक्ती!…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

               सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा संगित, साहित्यिक, नाट्य व कला क्षेत्रातील नवोदित कलावंतांना प्रोत्साहन देणा-या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य संयोजिकापदी चंद्रपूरच्या मुळ रहिवाशी योगशिक्षिका रंज्जू दिलीप मोडक यांची सलग चवथ्यांदा निवड करण्यात आली आहे. तर नव्याने प्रारंभ झालेल्या राणी सखी मंचच्या संयोजिकापदी उच्च शिक्षित चंद्रपूरच्या समाजसेविका प्रियंका चिताडे यांची नियुक्ती करण्यात आली आहेत

            सदरहू नियुक्त्या नागपूर सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका समाजसेविका मायाताई कोसरे, जेष्ठ साहित्यिक ॲड.मेघा धोटे, सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार, सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, व जेष्ठ साहित्यिक विजया भांगे यांनी केल्या आहेत.

           सहज सुचलंच्या सहसंयोजिका पदाची जबाबदारी मुलच्या समाजसेविका नलिनी आडपवार यांच्याकडे सोपविण्यात आली असून राणी सखी मंचच्या सहसंयोजिकापदाची जबाबदारी चंद्रपूरच्या रुपा चालखूरे यांच्याकडे देण्यात आली आहे.

         मोडक ह्या शहरातील योगनृत्य परिवार मध्ये सहभागी असून त्यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी मुलमधील लोकहितच्या वतीने मागिल वर्षी पत्रकार भवनात पार पडलेल्या एका भव्य समारंभात महिला कर्तृत्ववान सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

          या कार्यक्रमाचे आयोजन मुल नगरीचे दत्तात्रय समर्थ व अर्चना समर्थ यांनी केले होते.या शिवाय त्यांना बरेच सन्मान पुरस्कार प्राप्त झाले आहे.

          सामाजिक कार्यात विशेष रुची असणा-या प्रियंका चिताडे यांचे आजपर्यंतचे कार्य अतिशय उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे.

           त्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी या पूर्वी विदर्भातील विविध सामाजिक संघटना व संस्था कडून अनेक सन्मान पुरस्कार बहाल झाले आहे.महिला वर्गात त्या लोकप्रिय आहे.

अनेकांनी केले स्वागत! 

           रंज्जू मोडक, प्रियंका चिताडे, नलिनी आडपवार व रुपा चालखूरे यांच्या नियुक्त्यांचे अनेकांनी स्वागत केले आहे.