भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा :- जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा सन 2025 /26 नुकत्याच पार पडल्या. याच कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रत्येक संवर्गातील उत्कृष्ट अधिकारी,कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.
त्यामध्ये पंचायत समिती धानोरा अंतर्गत ग्रामपंचायत चातगाव येथे कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी रणजीत राठोड यांचा गुणवंत अधिकारी म्हणून गौरव करण्यात आला.
रणजीत राठोड हे चातगाव येथे रुजू झाल्यापासून ग्रामपंचायतीला नाविन्यपूर्ण उपक्रम, शासनाचे वेळोवेळी राबविण्यात आलेले अभियान, तसेच शासनाच्या सर्व योजना लोकापर्यंत लवकरात पोहोचविणे व योजना 100% कार्यान्वित करणे अशा प्रकारच्या विविध उपक्रमात सहभागी होऊन गावाची विकासाकडे वाटचाल केलेली आहे.
कामासंबंधी कायदे, नियम, व प्रचलित कार्यपद्धती, माहिती तंत्रज्ञान, संबंधित क्षेत्रातील ज्ञान, सचोटी, चारित्र्य या सर्व बाबीचा समावेश त्यांच्या कार्यात असल्यामुळे प्रशासनाने त्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय गुणवंत ग्रामपंचायत अधिकारी म्हणून शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
त्याप्रसंगी सुहास गाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, राजेंद्र भुयार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, काळभोर साहेब प्रकल्प संचालक डी आर डी ऐ, नितीन पाटील कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, चेतन हिवांज उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, पंकज भोयर उपमुख्य कार्यकारी जिल्हा परिषद गडचिरोली व इतर सर्व अधिकारी तसेच हे कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले शेकडो जिल्हा परिषद कर्मचारी आपआपल्या कुटुंबासह उपस्थित होते.



