शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर येथील ग्रामगीता महाविद्यालयाच्या करिअर कौन्सिलिंग आणि प्लेसमेंट कमिटी आणि रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त वतीने महाविद्यालयात मेगा प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले आहे.
तरुण प्रतिभांसाठी त्यांचे करिअर घडविण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची आहे.या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये, पुणे येथील प्रतिष्ठित कंपनी “बेकर्ट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड” ही रसायनशास्त्र शाखेतील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना,पदवीधरांना आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना करिअरच्या सुवर्ण संधी प्रदान करत आहे.निवडलेल्या उमेदवारांना पुणे येथील एमआयडीसी येथे नियुक्त केले जाईल.
प्राचार्य डॉ.सुनंदा एस. आस्वले यांनी माहिती देत असताना सांगितले की,ग्रामगीता महाविद्यालयात पहिल्यांदाच प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येत आहे.या प्रकारच्या भरती मोहिमेमुळे विद्यार्थांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतात ज्यामुळे रोजगार आणि स्वयंपूर्णता मिळते.
एचआर मॅनेजर,श्री.सुनील चव्हाण म्हणाले की,आम्ही सर्व पात्र विद्यार्थ्यांना उत्साहाने आणि आत्मविश्वासाने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतो.चांगली तयारी करा,तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि तुमची प्रतिभा दाखविण्या करिता या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. तुमचे भविष्य तुम्ही आज निवडलेल्या संधींपासून सुरू होते.ही संधी चुकवू नका!
रसायनशास्त्र शाखेतील अंतिम वर्षाचे विद्यार्थी,पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधर विद्यार्थ्यांनी मेगा प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होऊन आपले भविष्य उज्ज्वल करा.



