Home Political साकोलीकरांनी दिलेल्या संधीचे सोने करणार, नगरसेवक प्रमोद गजभिये यांची ग्वाही… 

साकोलीकरांनी दिलेल्या संधीचे सोने करणार, नगरसेवक प्रमोद गजभिये यांची ग्वाही… 

ऋग्वेद येवले

 उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : साकोली नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा मधील जनतेने दिलेल्या संधीचे सोने करेन. माझ्या कार्यकाळात साकोलीच्या सर्वांगीण विकासाकरिता सदैव कटिबद्ध आहे अशी ग्वाही नवनिर्वाचित नगरसेवक प्रमोद गजभिये यांनी दिली.

        साकोलीत मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सुविधा असल्या तरी शहरातील सामाजिक वातावरण बहुजनांना बरोबर घेऊन जाणारे आहे.साकोली शहराच्या चौफेर विकासासाठी कटिबद्ध राहणार असून माझी विजय वाटचाल आणि पक्षाने दाखवलेला विश्वास मी जनतेच्या आशीर्वादामुळे सार्थ ठरू शकलो असे यावेळी सांगितले.

         नुकत्याच झालेल्या साकोली पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग सहा मध्ये गजभिये यांनी काँग्रेसचे उमेदवार ओम प्रकाश गायकवाड यांचा ५४ मतांनी पराभव केला. 

             मूलभूत प्रश्नांची जाण व कामांचा जलद निपटारा करण्याचा प्रयत्न गजभिये यांनी सदैव केला भाजपचे नेते, विधान परिषद सदस्य परिणय फुके, नेपाल रंगारी,नवनिर्वाचित नगराध्यक्ष देवश्री कापगते ,मनीष कापगते, शहर अध्यक्ष व्यंकटेश येवले, माजी आमदार राजेश काशीवार तसेच येथील ग्रामस्थ मंडळ यांची बहुमोल साथ मिळाल्याने शहरातील बहुचर्चित प्रभाग सहा मध्ये आपला विजय सुखर झाल्याचे प्रमोद गजभिये यांनी सांगितले.