ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
लाखनी :- 26 डिसेंबर 2025 बापूसाहेब लाखनीकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लाखनी येथे प्राचार्या पी एच दहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख अतिथी श्री प्रशांत बेतावार सर गटनिदेशक प्रमुख वक्ते श्री भागवत बडवाईक सर पगाजी विद्यालय कोलारी सौ अर्चना जगाडे मॅडम, श्री राजुजी भुरे सर वीर बालक भूषण भीमराव हुमे पगाजी विद्यालय कोलारी तुम्हारी दिप्ती भीमराव अतकारी पी एम श्री गांधी विद्यालय लाखनी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते बापूसाहेब लाखनीकर यांच्या पुण्यतिथीच्या औचित्य साधून पूजन आणि पुष्पमाल्यापऀन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात वंदेमातरम या राष्ट्रगीताने झाली. वीर बालक दिनी शपथ घेण्यात आली पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
पाहुण्यांच्या शुभहस्ते वीर बालक राज्यस्तरिय खेळाडू भूषण भिमराव हुमे श्री पगाजी विद्यालय कोलारी व कुमारी दीप्ती भीमराव अतकारी पीएमसी गांधी विद्यालय लाखनी यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.विर बालक दिनी व्हिडीयो चित्रफिती दाखविण्यात आली.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थींनी वीर बाल दिना विषयी आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख वक्ते श्री भागवत साधुराव बडवाईक सर श्री पगाची विद्यालय कोलारी यांनी बापूसाहेब लाखनी कर यांच्या जीवनावर प्रकाश टाकुन शिखांचे गुरु गुरुगोविंद सिंह यांच्या बाल वीरांची शौर्य पराक्रम महिमा सांगितली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश बहिरे, शुभम व्यवहारे, सीमा सतदेवे ,ईश्वरी भिवगडे ,प्रशांत वैद्य, हेमंत पिल्लेवान,नितेश सतदेवे यांनी सहकायऀ केले सूत्रसंचालन व आभार श्री चक्रधर पाखमोडे सर यांनी केले



