Home Political इंदापूरसाठी भरीव निधी देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही… — नवनिर्वाचित...

इंदापूरसाठी भरीव निधी देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही… — नवनिर्वाचित अध्यक्ष भरत शहा यांचा अजित पवार यांच्या हस्ते झाला सन्मान….

 बाळासाहेब सुतार 

निरा नरशिंहपुर प्रतिनिधी 

 इंदापूर नगरपरिषदेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निवडणूक निकालानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत शहा व विजयी १४ नगरसेवक तसेच पराभूत उमेदवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची पुणे येथे सदिच्छा भेट घेतली.

         ही भेट सोमवारी (दि. २२ डिसेंबर) राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच पराभूत उमेदवारांनी निराश न होता नव्या जोमाने जनतेसाठी कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. लोकशाही

अजित पवार यांची ग्वाही : नगराध्यक्षांसह, नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार…

        भरणे व उपस्थित मान्यवर पुणे : इंदापूर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत शहा यांचा सन्मान करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय…

           प्रक्रियेत विजय-पराजय स्वाभाविक असतो; मात्र जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करणे हीच खरी कसोटी आहे, असे स्पष्ट करत अजित पवार यांनी इंदापूर शहराच्या विकासाबाबत ठाम भूमिका मांडली.

           इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनासह केंद्र शासनाच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल. सर्व नगरसेवक, पदाधिकारी व प्रशासनाला विश्वासात घेऊन समन्वयाने काम करा. इंदापूरला आदर्श शहर म्हणून उभे करा, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.

          यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूरच्या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत निवडणुकीत भरीव कौल दिला आहे. या विश्वासाला पात्र ठरत नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरतशेठ शहा व सर्व नगरसेवक प्रत्येक प्रभागात दर्जेदार विकासकामे, मूलभूत सुविधा आणि गोरगरीब जनतेच्या अडचणी वेगाने सोडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

         या सदिच्छा भेटीदरम्यान जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाअध्यक्ष हनुमंत कोकाटे, तसेच तालुक्यातील वरिष्ठ पदाधिकारी, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.