Home Political इंदापूर नगरपरिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता, भरत शहा यांची नगराध्यक्षपदी निवड… — कृषिमंत्री...

इंदापूर नगरपरिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता, भरत शहा यांची नगराध्यक्षपदी निवड… — कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी केले इंदापूर मतदारांचे आभार व्यक्त…

 बाळासाहेब सुतार 

निरा नरशिंहपुर प्रतिनिधी 

         इंदापूर नगरपालिकेच्या झालेल्या अटीतटीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांनी कृष्णा भीमा विकास आषाडीचे उमेदवार प्रदीप गारटकर पांचा पराभव करत नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्चा निर्विबाद झेंडा फडकवला.

         निवडणूकीच्या दिनांक २१ डिसेंबर रोजी शासकीय गोदामात झालेल्या मतमोजणीनंतर इंदापूरच्या मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा यांच्यासह १७ नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करत नगरपरिषद इतिहासात पहिल्यांदाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडे निर्भेळपणे इंदापूर नगरपरिषदेची सता सोपवली आहे. त्यामुळे नवीन विकासपर्वास प्रारंभ होत आहे.

             नगरपालिकेच्या विजय जल्लोष प्रसंगी पुणे जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नाने इंदापूर शहराचा चेहरा मोहरा बदलणार व इथून पुढे गतीने विकास होणारच संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे उद्गार.

          संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत नविन राजकीय समीकरण तयार होऊन भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे गट, रासप व इतर लहानमोठ्या पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध कृष्णा भीमा विकास आघाडी तयार करण्यात आली होती.

        या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांना पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पक्षाविरुद्ध बंड करून ही निवडणूक लढवली होती. त्यांना सहा नगरसेवक पदाच्या जागांवर समाधान मानावे लागले. काही ठिकाणी नोटास पडलेल्या मतांमुळे त्यांच्या आघाडीचा पराभव झाला आहे. 

          निकालानंतर गुलालाची उधळण करत भरत शहा यांना उचलून घेत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ.अंकिता मुकुंद शहा तसेच भरत शहा यांची सुविद्य पत्नी सौ.वैशाली शहा यांनी भरत आता परत अशी जोरदार घोषणाबाजी केली. विजय संपादन केलेल्या भरत शहा व त्यांच्या सहकारी नगरसेवकांची कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेत संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात आली.