Home Social गेवरा खुर्द येथे शेतकऱ्याच्या धान पुंजणाला आग; आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांची आर्थिक...

गेवरा खुर्द येथे शेतकऱ्याच्या धान पुंजणाला आग; आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांची आर्थिक मदत…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

        सावली तालुक्यातील मौजा गेवरा खुर्द येथील शेतकरी लुमाजी आको रामटेके यांच्या शेतातील धानाचे पुंजणे अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाले. या आगीत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

        या घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी तात्काळ दखल घेत शेतकरी लुमाजी रामटेके यांना आर्थिक मदत प्रदान केली. संकटाच्या काळात शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका आमदार वडेट्टीवार यांनी घेतल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

       यावेळी तालुका अध्यक्ष नितीन गोहने, महिला तालुका अध्यक्ष उषा भोयर,युवा नेते आकाश पाटील येणप्रेड्डीवार, अंकुश पाटील येणप्रेड्डीवार, हंसराज रामटेके, वसंत हूलके, गुरु चापले, पोलीस पाटील रमेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

         या घटनेमुळे नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणे गरजेचे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.