Home Maharashtra येंगलखेडा येथे सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत घेण्यात आली सभा…

येंगलखेडा येथे सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत घेण्यात आली सभा…

राजेंद्र रामटेके 

 विशेष प्रतिनिधी 

     आदिवासी विविध कार्यकारी सहकारी मर्या.संस्था येगलखेडा येथे कर्जमाफी बाबत सर्व शेतकऱ्यांची सभा नुकतीच घेण्यात आली.

         या सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर जुमनाके (सोन्सरी) हे होते तर सभेला उपाध्यक्ष मंजुळाताई सोनगाये सुध्दा उपस्थित होत्या. (सरपंच ग्रामपंचायत शिवणी)

          सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विविध कार्यकारी सहकारी मर्या.संस्थाचे अध्यक्ष श्री.बाळकृष्ण शेळमाके,श्री.दयाराम उसेंडी अंगारा अध्यक्ष (आविका),श्री.दादाजी पाटील सुकारे उपाध्यक्ष अंगारा (आविका),यांच्या सह विविध आविकाचे अध्यक्ष तथा उपाध्यक्ष सभेला उपस्थित होते.

       याचबरोबर परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी या सभेला हजेरी लावली होती.या सभेमध्ये चालू व थकीत कर्ज कुठल्याही बाॅंकांनी मागू नये व शेतकऱ्यांनी कुणालेही कर्ज देऊ नये असे सदर सभेमध्ये ठरवीण्यात आले.

           सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे ही महाराष्ट्र सरकरची जबाबदारी आहे.यामुळे थकीत व चालू कर्ज शेतकऱ्यांनी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा सुर सभेमध्ये उमठला.

         सभेला उपस्थित असणाऱ्या सर्वांचे आभार जयवंत कापकर यांनी मानले.