Home Maharashtra तिरखूरा येथील पटाचा बैल व २ दुधाळू गायीला वाघाने केले फस्त तर...

तिरखूरा येथील पटाचा बैल व २ दुधाळू गायीला वाघाने केले फस्त तर दोन जनावरे केले जखमी… — स्थळ पंचनामा केला असून,ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले व गस्त वाढविण्यात आली.

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

      चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा तिरखूरा येथील जनावरांच्या गोठ्यात शिरुन वाघाने एक पटाचा बैल,दोन दुधाळू गायी मारल्यात.तर दोन जनावरे जखमी केले आहेत.

               मौजा तिरखूरा येथील पट्टा क्रमांक १०२ मधील गोठ्यात वाघाने रात्रोच्यावेळी जनावरांवर हल्ला केला.स्थळ पंचनामा श्री.आर.डी.मेश्राम प.स.चिमूर व वनरक्षक गदगाव यांनी केला आहे.

             मौजा तिरखूरा येथील रहिवासी असलेले श्री.तेजराज बापूराव धाडसे यांचा पटाचा बैल,श्री.शंकर मारोती मुंढरे यांच्या दुधाळू दोन गायी वाघाने मारल्या असून श्री.शंकर मारोती मुंढरे यांचा बैल व श्री.मारोती हरी कुमरे यांची गाय त्याच वाघाने जखमी केले.

            घटना स्थळी व आजूबाजूला वाघाला टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.