Home Political वंचित आणि काॅंग्रेस एकत्र येणे म्हणजे एकमेकांची मजबूती म्हणण्यापेक्षा,या एकीमागे मतदारांचीच मोठ्या...

वंचित आणि काॅंग्रेस एकत्र येणे म्हणजे एकमेकांची मजबूती म्हणण्यापेक्षा,या एकीमागे मतदारांचीच मोठ्या प्रमाणात सुरक्षा… — महानगरपालिका निवडणूक राज्यातील समाजमन बदलवणार?….

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

          महाराष्ट्र राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणूका होऊ घातलेल्या आहेत.या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अंतर्गत १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे तर १६ जानेवारी २०२६ ला मतमोजणी होणार आहे.

          महानगरपालिकांच्या होणाऱ्या निवडणुका जनमानसात विशेष प्रभाव पाडणाऱ्या असतात.यामुळे महानगरपालिकांच्या निवडणूकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

          म्हणूनच महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची राज्यभरात युती होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

           वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची महानगरपालिका निवडणूकीत होणारी युती दोन्ही पक्षांना बळकटी देणारी ठरणार असली तरी या युतीमागे मतदारांची सर्वात मोठी सुरक्षा आहे हे निट लक्षात येते.

          भाजपा व त्यांचे मित्र पक्ष मतदारांना निवडणुकीच्या तोंडावर किंवा एखाद्या योजना अंतर्गत रुपये देतात.पण,सर्व प्रकारच्या मतदारांना त्यांच्या अधिकारांतर्गत शासन-प्रशासनात कधीच महत्वपूर्ण सहभाग देत नाही.

           याचबरोबर भाजपा व त्यांचे मित्र पक्ष अनेक बेकायदेशीर कायदे करुन मतदारांच्या अस्तित्वाला धोक्के निर्माण करतात हे सत्य आहे.

             नागरिकांच्या मुलभूत अधिकारांना धोका निर्माण होईल असे कुठल्याही प्रकारचे कायदे केंद्र सरकारला व राज्य सरकारला करता येत नाही.पण,बहुमताच्या जोरावर जनतेला वेठीस धरणारे कायदे करतात असे वास्तव आहे.

          अशा कायद्याची अंमलबजावणी होण्यापासून रोखण्यासाठी महानगरपालिका निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या युतीला विशेष महत्त्व असेल..

           याचबरोबर वंचित बहुजन आघाडीला मानणारा मतदार हा रुपयांपेक्षा स्वतःच्या एकीला,ताकदीला,स्वाभिमानाला आणि अस्तित्वाला महत्व देत असल्याने याचा फायदा दोन्ही पक्षांना होणार आहे.

        तद्वतच मतदार हा निवडणूकीत राजा असला तरी त्यांना रुपयांच्या प्रलोभनांनी पुरते ग्रासले असल्याचे दिसून आले आहे.ज्यांच्याकडून जास्त रुपये भेटतात त्यांच्या बाजूने मतदार वळवली जातात हे सध्याचे निवडणूक अंतर्गत राजकीय सुत्र वेगाने रुढ झाले आहे.

             बऱ्याच मतदारांना स्वतःचे अस्तित्व,अधिकार कळत नसल्याने आणि मतदार हा स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य देत नसल्याने तो मतदार निवडणूकी अंतर्गत रुपयांना प्राधान्य देतो आहे.

       ज्या दिवशी भारत देशातील मतदार जागरूक होईल व मताचा अधिकार कशासाठी आहे हे समजून घेईल त्या दिवसापासून मतदार हा रुपयांच्या,दारुच्या,मटनाच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही हे वास्तव ठरणार आहे.

            मात्र वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड.प्रकाश आंबेडकर व वंचितचे युवा नेतृत्व सुजात आंबेडकर यांनी विविध समाज घटकातील नागरिकांच्या मनात आपल्या योग्य कृतीतून व कर्तव्यातून स्थान निर्माण केले असल्याने,”ते नागरिक, अँड.प्रकाश आंबेडकर व सुजात आंबेडकर यांच्या हाकेला प्रतिसाद देणार आहेत..

           याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मतदार हे त्यांच्या पक्ष उमेदवारांसह वंचित उमेदवारांच्या बाजूने झाल्यास महानगरपालिका निवडणूकीतंर्गत बराच बदल महाराष्ट्र राज्यातील राजकारणात झालेला दिसेल.

            महाराष्ट्र राज्यासह देशात बहुजन समाजातील व्यक्ती खुप शिकलेले आहेत.पण राजकीय व सामाजिक क्षेत्रात समजदार,अनुभवी,ज्ञानी, मुत्सद्दी,समाजहितोपयोगी स्वाभिमानी,असल्याचे दिसून येत नाही.यामुळेच सत्तेच्या आड अत्याचार व अन्याय्य करणाऱ्यांचे फावते आहे.

       म्हणूनच येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची होणारी युती महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना वाचविणारी व तारणारी ठरु शकते…