Home Political आळंदी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय; आदित्य–ऋतुजा...

आळंदी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय; आदित्य–ऋतुजा घुंडरे दाम्पत्याची सरशी…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : आळंदी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेनेने मोठा विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा घुंडरे व आदित्य घुंडरे या पती–पत्नीने भाजपच्या उमेदवारांचा पराभव करत दणदणीत विजय नोंदवला.

           महिला राखीव जागेवर शिवसेनेच्या ऋतुजा घुंडरे यांना तब्बल १११८ मते मिळाली, तर भाजपच्या ज्योती घुंडरे यांना ५१५ मते पडली. त्यामुळे ऋतुजा घुंडरे या ६०३ मतांच्या स्पष्ट फरकाने विजयी ठरल्या.

           तर दुसऱ्या जागेसाठी झालेल्या लढतीत शिवसेनेचे आदित्य घुंडरे यांना १०९५ मते मिळाली, तर भाजपचे सचिन घुंडरे यांना ५३८ मते मिळाली. आदित्य घुंडरे यांनी ५५७ मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला.

          या प्रभागातील ही लढत अत्यंत चुरशीची मानली जात होती. मात्र प्रचारादरम्यान स्थानिक प्रश्न, विकासकामांचा लेखाजोखा आणि जनतेशी असलेला थेट संवाद या जोरावर शिवसेनेच्या उमेदवारांनी मतदारांचा विश्वास संपादन केला.

           या विजयामुळे प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाली असून, शहराच्या राजकारणात या निकालाची मोठी चर्चा होत आहे. निकाल जाहीर होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.