Home Political नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत वंचित ठरली वंचितांचा आधार!… — अभुतपुर्व यश,पक्षाचे...

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत वंचित ठरली वंचितांचा आधार!… — अभुतपुर्व यश,पक्षाचे खंबीर नेतृत्व व पक्षाची बळकटी आली कामाला..‌.

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

       महाराष्ट्र राज्यात झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत स्थानिक पातळीवर अभुतपुर्व यश संपादन केले असल्याचे दिसून आले आहे.

          पाच ठिकाणी वंचितचे नगराध्यक्ष निवडून आले असून अनेक ठिकाणी वंचितचे नगरसेवक निवडून आले आहेत,विजयी उमेदवार हे वंचितांसाठी मोठा आधार ठरला आहेत..

                               नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून हे लक्षात आले की मतदार हे स्वाभिमानी असून निर्धन उमेदवारांची ते ताकद ठरतात.

           म्हणूनच महाराष्ट्र राज्यात नगरपरिषद व नगरपंचायत अंतर्गत वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक हे मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत.

               तद्वतच या यशामागे वंचित बहुजन आघाडी,महिला आघाडी,युवक आघाडी,सम्यक विद्यार्थी व आजी माजी पदाधिकाऱ्यांची मेहनत,त्यांची एकजुटता,त्यांचा संघर्ष,आणि पक्ष नेतृत्वावरील दृढ विश्वास आहे.

                   वंचितचे सर्वेसर्वा अँड.प्रकाश आंबेडकर व वंचितचे युवा नेतृत्व सुजात आंबेडकर हे वंचितांसाठी,मोठा आधार म्हणून महाराष्ट्र राज्यात पुढे आले आहेत.

          याचबरोबर सर्व समाजातील नागरिकांवरील अन्याय व अत्याचार खपवून घेणारे नेतृत्व नसल्याने त्यांच्याप्रती आदम्य विश्वास वंचित,पिडीत,अन्यायग्रस्त व अत्याचारग्रस्त नागरिकांत निर्माण झाला आहे.

            यामुळे नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत वंचितला घवघवीत यश संपादन करता आले.नेतृत्व कणखर तर जनता खंबीरपणे मागे राहणारच!

              याचबरोबर हा विजय केवळ निवडणुकांचा नाही,हा स्वाभिमानाचा, प्रतिनिधित्वाचा आणि बहुजनांच्या राजकीय हक्काचा ब जागृतीचा विजय आहे.लोकशाहीने पुन्हा सिद्ध केल राजा केवळ मतपेटीतून जन्म घेतो असे वंचितचे सर्वेसर्वा अँड.प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.