Home Political नागभिड नगरपरिषद राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे… — मतदारांनी मारली बाजी..

नागभिड नगरपरिषद राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे… — मतदारांनी मारली बाजी..

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादीका 

         नागभिड नगरपरिषद हे चिमूर विधानसभा मतदारसंघात येत असून यावेळी तेथील मतदारांनी भाजपाला वगळून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे.

          नागभिड नगरपरिषद मध्ये २० पैकी नगराध्यक्षासह १३ नगरसेवक हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निवडून आल्याने आमदार किर्तीकुमार भांगडीया यांना तेथील मतदारांनी नाकारले आहे.

         मागील पंचवार्षिकमध्ये नागभिड नगरपरिषद मध्ये भाजपाची सत्ता होती.यावेळी तेथील मतदारांनी भाजपाला सत्तेपासून दूर केले व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या हातात सत्तेची चाबी दिली.

           माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जुनेद खान आणि स्थानिक नेत्यांनी नियोजनबध्द पध्दतीने नागभिड नगरपरिषदेची निवडणूक लढवली व जिंकली.

          सौ.स्मिता प्रफुल्ल खापर्डे या नागभिड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष झाल्या असून त्यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या १३ नगरसेवकांना नागभिड येथील मतदारांनी योग्य सेवा करण्याची संधी दिली.

           नागभिड नगरपरिषद हद्दीतील मतदारांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बाजूने दिलेला कौल हा भविष्यात राजकीय चित्र बदलवणारा ठरु शकतो.