Home Political विक्रमी कौल, भाजपची एकहाती सत्ता!… — आळंदीत प्रशांत कुऱ्हाडेंचा दणदणीत विजय;...

विक्रमी कौल, भाजपची एकहाती सत्ता!… — आळंदीत प्रशांत कुऱ्हाडेंचा दणदणीत विजय; १५ जागांवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रशांत कुऱ्हाडे यांनी विक्रमी मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत शहराच्या राजकारणावर आपली पकड अधिक भक्कम केली. मतदारांनी दिलेल्या या ठाम कौलामुळे आळंदी नगरपरिषदेवर भाजपची एकहाती सत्ता स्पष्ट झाली असून, विकासाभिमुख नेतृत्वावर जनतेने विश्वास टाकल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

         नगरसेवक पदाच्या निवडणुकीत भाजपने १५ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. शिवसेनेला ४, तर राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागांवर समाधान मानावे लागले. एकूण निकाल पाहता आळंदीत भाजपचा दबदबा अधिक ठळकपणे पुढे आला आहे.

प्रभागनिहाय विजयी उमेदवार…

प्रभाग १अ – ऋतुजा आदित्य घुंडरे (शिवसेना)

प्रभाग १ब – आदित्य हनुमंत घुंडरे (शिवसेना)

प्रभाग २अ – वैजयंता अशोक उमरगेकर (भाजप)

प्रभाग २ब – रामचंद्र दत्तात्रय भोसले (भाजप)

प्रभाग ३अ – पूजा संजय घुंडरे (भाजप)

प्रभाग ३ब – सोमनाथ कुंडलिक कुऱ्हाडे (भाजप)

प्रभाग ४अ – येळवंडे कांचन किरण (भाजप)

प्रभाग ४ब – गोविंदा उर्फ सागर निवृत्ती कुऱ्हाडे (भाजप)

प्रभाग ५अ – संतोष मारुती रासकर (भाजप)

प्रभाग ५ब – खुशी सागर बोरुंदिया (भाजप)

प्रभाग ६अ – साक्षी अक्षय कुऱ्हाडे (भाजप)

प्रभाग ६ब – सागर उर्फ हेमंत गुलाब कुऱ्हाडे (भाजप)

प्रभाग ७अ – अरुणा ज्ञानेश्वर घुंडरे (शिवसेना)

प्रभाग ७ब – सुनील ज्ञानेश्वर घुंडरे (भाजप)

प्रभाग ८अ – सचिन रामदास गिलबिले (भाजप)

प्रभाग ८ब – सुजाता कालिदास तापकीर (भाजप – बिनविरोध)

प्रभाग ९अ – दिनेश रामदास घुले (भाजप)

प्रभाग ९ब – अर्चना विजय तापकीर (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग १०अ – सुरेश खंडेराव झोंबाडे (शिवसेना)

प्रभाग १०ब – ऋतुजा अनिकेत तापकीर (भाजप)

प्रभाग १०क – उज्वला दिपक काळे (राष्ट्रवादी काँग्रेस)

        निकाल जाहीर होताच शहरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.

          “हा विजय आळंदीच्या सर्वांगीण विकासाचा कौल आहे. शहराच्या प्रगतीसाठी दिलेल्या शब्दाला आम्ही प्राधान्य देऊ,” अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी व्यक्त केली. या निकालामुळे आगामी काळात आळंदीतील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत असून, विरोधी पक्षांसमोर नवे राजकीय आव्हान उभे राहिले आहे.