Home Political साकोलीत भाजपाने मारली बाजी,जनतेची नव्या तरूणांना पसंती… — भाजपाच्या नगराध्यक्षा देवश्री...

साकोलीत भाजपाने मारली बाजी,जनतेची नव्या तरूणांना पसंती… — भाजपाच्या नगराध्यक्षा देवश्री मनिष कापगते यांचा २२३० मतांनी ऐतिहासिक विजय… — शिवसेना ०१, कॉंग्रेस ०७,भाजपा ०८,राष्ट्रवादी ०१, अपक्ष ०३ जागेवर विजयी…

निलय झोडे

  उपसंपादक 

दखल न्यूज भारत

साकोली : दुसऱ्या पंचवार्षिक ०२ डिसेंबरला झालेल्या साकोली सेंदूरवाफा नगरपरिषदेच्या रणसंग्रामात येथील मतदार जनतेने येथे नव्यांना संधी दिली आहे. तर भाजपाने आपला गड राखित माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते यांची सून व भाजपा नेते ॲड. मनिष कापगते यांची पत्नी देवश्री कापगते यांचा २२३० मतांनी ऐतिहासिक विजय झाला.

         या नगराध्यक्षा पदाच्या त्रिकोणी लढतील कॉंग्रेसच्या सुनिता अशोक कापगते यांना ४४४७, तर राष्ट्रवादीच्या भारती मोहन लंजे यांना ३५०८ मते प्राप्त झाली. रविवार २१ डिसेंबरला नविन तहसील कार्यालयावर मतमोजणी दरम्यान साकोली पोलीसांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. 

           साकोली सेंदूरवाफा नगराध्यक्षा पदाकरिता भाजपाच्या देवश्री मनीष कापगते यांना ६६७७ मते, कॉंग्रेसच्या सुनिता अशोक कापगते यांना ४४४७ तर राष्ट्रवादीच्या भारती मोहन लंजे यांना ३५०८ मते मिळाली यात भाजपच्या देवेश्री कापगते यांनी कॉंग्रेसच्या सुनिता कापगते यांचा २२३० मतांनी पराभव करीत ऐतिहासिक विजय मिळविला.

          तर नगरसेवक व नगरसेविका पदांसाठी प्रभाग १ मधून पुष्कर करंजेकर शिवसेना, वैशाली लांजेवार काँग्रेस. प्रभाग २ मधून राजकुमार पोगडे भाजपा, त्रिवेणी चौधरी काँग्रेस. प्रभाग ३ मधून कुणाल राऊत काँग्रेस, रोहिणी मुंगुलमारे अपक्ष, प्रभाग ४ मधून पंकज मुंगुलमारे भाजपा, प्रीती डोंगरवार भाजपा. प्रभाग ५ मधून संदीप बावनकुळे काँग्रेस, मेघा बडवाईक भाजपा. प्रभाग ६ मधून प्रमोद गजभिये भाजपा, सायली दोनोडे कॉंग्रेस. प्रभाग ७ मधून किशोर पोगडे भाजपा, रेणू गणवीर भाजपा. प्रभाग ८ मधून नयन पटेल राष्ट्रवादी, निर्मला नंदेश्वर कॉंग्रेस. प्रभाग ९ मधून विवेक बैरागी अपक्ष, मिना लांजेवार भाजपा. प्रभाग १० मधून सपन कापगते अपक्ष, स्मिता सिडाम कॉंग्रेस यांनी आपल्या प्रभागातून विजय प्राप्त केला. 

         झालेल्या निवडणुकीत यंदा जागृत जनतेने बराच उलटफेर व बदल घडविला. आता येथे उपाध्यक्ष पदासाठी चांगलीच रस्सीखेच होणार असून तीन अपक्ष उमेदवारांपैकी दोन तर भाजपाचेच असल्याने भाजपाची सत्ता होणार हे निश्चित झाले आहे.

         आज रविवारी विजयी उमेदवारांची विजयी रॅली काढण्यात आली तर तहसिल कार्यालय ते राष्ट्रीय महामार्गावर साकोली पोलीस निरीक्षक एम.पी.आचरेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस व वाहतूक पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.