धर्म म्हणजे संस्कार, धर्म म्हणजे आचरण, धर्म म्हणजे नैतिकता अशी धर्माची व्याख्या करून एका धर्मातून दुसरा धर्म निर्माण झाला, ज्या धर्मात शोषण अन्याय अत्याचार शिगेला पोहोचला त्याचा त्रास जेव्हा त्या धर्मातील लोकांना व्हायला लागला तेव्हा कोणीतरी दुसरा धर्म काढला, तसेच ज्या धर्मात अनैतिकतेचा अतिरेक झाला म्हणजेच खोटे बोलणे, चोरी करणे, धोका देणे, हिंसा करणे, बेबी चार करणे, भ्रष्टाचार करणे, व्यसनाधीन होणे अशा अनिष्ट गोष्टीने कहर केला तेव्हा समाज नीतीमतेने वागाव म्हणून, माणसाचे मन आणि विचार याला नैतिकतेचे अधिष्ठान मिळावे म्हणून एक नवीन धर्म काढण्यात आला, म्हणजेच धर्मात जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा नवीन धर्माची स्थापना होते किंवा ज्या धर्माला ग्लानी येते तेव्हा त्या धर्मातील घाण साफ करण्यासाठी त्याच धर्मात कोणीतरी एक महामानव निर्माण होतो, ठाणे त्या धर्मातील घाण झाडून पुसून धुवून काढण्याचा प्रयत्न करतो, तरीपण ती जात नाही, तेव्हा दुसरा धर्म असा महामानव निर्माण करतो किंवा स्वीकारतो हे वास्तव आपल्या सगळ्यांनाच माहित आहे.
हे जरी खरे असले तरी, जेव्हा जेव्हा नवीन धर्म निर्माण झाले तेव्हा त्यांनी त्या धर्माचे आचरण म्हणून किंवा वैशिष्ट्य म्हणून एक सांस्कृतिक नियम तयार केले, त्या धर्माची सांस्कृतिक बैठक निर्माण केली, त्या धर्माचे काही रूढी परंपरा निर्माण केल्या, त्यामुळे प्रत्येक धर्माची संस्कृती ही वेगवेगळी आपणास दिसून येते.
परंतु असे करण्यामध्ये म्हणजे धर्माचे वेगळेपण दाखवण्यासाठी धर्माची वेगळी संस्कृती निर्माण केली, त्यामुळे एका माणसाला दुसरा माणूस आपल्यापेक्षा वेगळा वाटायला लागला, धर्मामुळे निर्माण झालेले हे ” वेगळेपण आणि वेगळेपणाचे हे वैशिष्ट्य “यातून दर्शनीक विषमता निर्माण झाली, याबरोबरच एक माणूस दुसऱ्या माणसापासून दुरावला, याचा अजून एक दुष्परिणाम असा झाला की, प्रत्येक धर्माची एक स्वतंत्र सांस्कृतिक जडणघडण यामुळे व्यक्तीचे सांस्कृतिक स्वातंत्र्य त्यास गमवावे लागले.
संस्कृती म्हणजे खानपान, पोशाख वेशभूषा, केशभूषा, ईश्वराची आराधना त्याचे प्रकार, देवाचे आणि देवळाचे विविध पण, रूढी परंपरा कर्मकांड म्हणजे धार्मिक संस्कृती निर्माण झाली, प्रत्येक धर्माची धार्मिक संस्कृती निर्माण झाली याचा परिणाम असा झाला की, प्रत्येक धर्माने आपण निर्माण केलेली संस्कृती चे पालन करणे हे शक्तीचे केले, त्यामुळे त्या त्या धर्माचे वेगळेपण दिसायला लागले, आणि माणसा माणसातील वेगळेपण दिसायला लागले.
विविधता आणि वेगळेपणा हा निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे याचे स्वातंत्र्य माणसाला असणे जरुरीची आहे, कारण माणूस हा सुद्धा निसर्गाचा एक घटकच आहे, त्यामुळे वेगळेपण आणि विविधता हा माणसाचा मूलभूत हक्क आणि अधिकार आहे, त्याचे स्वातंत्र्य त्याला हवे आहे, परंतु त्याचे हे सांस्कृतिक स्वातंत्र्य प्रत्येक धर्माने हिरावून घेतले, त्यावर बंदी घातली,”तुला हा धर्म स्वीकारायचा असेल तर अशाच प्रकारच्या देवळात जावे लागेल, अशाच प्रकारे देवाची आराधना करावी लागेल, अशाच प्रकारची केस भुसा करावी लागेल, अशाच प्रकारचे खानपान करावे लागेल, तसेच स्त्रियांना पण एवढेच केस ठेवावे लागतील, कुंकू लावावे लागेल किंवा लावता कामा नये, बोरख्यात राहावे लागेल किंवा बुरखा घेता कामा नये, पर पुरुषाशी बोलता कामा नये, मैत्री करता कामा नये, प्रेम करता कामा नये वैयक्तिक वागणुकीचे किंवा वर्तनाचे बंधन माणसावर लादल्या गेले त्यामुळे नैसर्गिकरित्या विविधता हा माणसाच्या विचारातील गुण किंवा गुणधर्म असल्यामुळे माणसाचे मन आणि बुद्धी यास कुंठीत करण्यात आले, त्यामुळे माणूस बंद करून उठायला लागला. त्यातून अनेक दुष्परिणाम पुढे येत आहेत, या दुष्परिणामात चे टोक म्हणजे हिंसा बळावली. जातीच्या आणि धर्माच्या अभिमानामुळे, धार्मिक संस्कृतीच्या अभिमानामुळे रूढी परंपरामुळे एक माणूस दुसऱ्या माणसापासून वेगळे झाला आणि तो एकमेकाचा शत्रू बनला आणि एक माणूस दुसऱ्या माणसास म्हणजे एका धर्माचा माणूस दुसऱ्या धर्माच्या माणसाला एका जातीचा माणूस दुसऱ्या जातीच्या माणसाला शत्रू समजून पाण्यात बघू लागला. याचे कारण धर्माने माणसा चा जो मूलभूत अधिकार आहे, तो म्हणजे सांस्कृतिक स्वातंत्र्याचा. तोच अधिकार धर्माने हिरावून घेतला. यामुळे करायला गेले एक आणि झाले दुसरेच, म्हणजे करायला गेला मारुती आणि झाले माकड, असे घडले,
खरे पाहू जाता, मानवी हक्क आणि अधिकार याचा जेव्हा गंभीरपणे विचार करायला लागू, तेव्हा माणसाचे आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक न्याय आणि स्वातंत्र्य हे त्यापासून कधीच हिरावून घेता कामा नये. आणि ही चूक झाली तर वास्तवामध्ये काय घडते हे आपण सगळे पाहतच आहोत, माणसाचे सांस्कृतिक स्वातंत्र्य जर हिरावून घेण्यात आले तर त्याच्यातून विषमता निर्माण होते, समता लोक पावते, बालपणापासूनच विषमतेचे संस्कार माणसावर व्हायला लागतात, यामुळे समतेचे विचार माणूस करणे सोडून देतो. असे घडायचे नसल्यास, म्हणजे विषमतेचे वातावरण किंवा व्यवस्था निर्माण करायची नसल्यास व्यवस्था ही समतेचीच निर्माण केली पाहिजे, समतेच्या व्यवस्थेत माणसाला आर्थिक सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य आणि न्याय मिळत असतो. आणि असे जेव्हा घडते तेव्हाच नीतिमत्ता टिकते. भ्रष्ट आचाराला जागा मिळत नाही, अवसर पण मिळत नाही. कारण समतेच्या व्यवस्थेत समतेचेच वातावरण असणार आणि समतेच्या वातावरणात समतेचे विचार रुजणार, हे सत्य आपणास स्वीकारावेच लागेल.
धर्माचा मूळ उद्देश नैतिकतेची स्थापना करणे, नैतिकतेचे आचरण म्हणजेच समाजाला सुख शांती समाधान आनंद मिळेल अशा प्रकारचे नियम आणि अशा प्रकारचे वातावरण निर्माण करणे हे धर्माचे खरे कार्य आहे, यासाठी वेगळे सांस्कृतिक जीवन किंवा वेगळी पूजा पाठ, वेगळी आराधना, अनेक देव आणि अनेक देवळे आणि देवळाचे अनेक प्रकार आणि प्रार्थनेचे अनेक प्रकार आणि माणसांच्या वेगवेगळ्या केस भुसावेशभूषा खानपान याचे बंधन घालण्याची कोणत्याही धर्माला जरुरत पडू नये.
कोणी काय खावे काय खाऊ नये, काय ल्यावे काय लेउ नये, केस किती कमी किती जास्त ठेवावे किंवा त्याची स्टाईल काय असावी, कोणत्या देवाला मानावे किंवा मानू नये, कोणत्या देवाची कोणत्या पद्धतीने पूजा करावी किंवा करू नये किंवा आराधना करावी किंवा करू नये, याचे बंधन स्त्रियांना असं की पुरुषांना असता कामा नये. धर्माचे काम फक्त नीतिमत्तेचा उपदेश करण्याचेच असले पाहिजे, माणसाच्या सांस्कृतिक स्वातंत्र्यावर बंधने आणण्याचे काम धर्माचे असता कामा नये. धर्मगुरूंनी फक्त नैतिकतेचेच बोलावे, भाषण द्यावे, कुण्या देवाची आणि कशी पूजा करावी याबद्दल सांगू नये, आणि सांगायचे झाले तरी, ज्याचे त्याला त्याच्या बुद्धीला जसे पटेल तसे करण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे, नव्हे कोणत्या देवाला मानायचे किंवा कोणत्या देवाची कशी आराधना किंवा पूजा करायची हे ज्याचे त्यांनी ठरवायचे आहे, पण नीतिमत्ता मात्र सोडता कामा नये, अशा प्रकार ची भाषा प्रत्येक धर्मगुरूची, धर्म मार्तंडाची, महाराज, काजी, भंते, फादर यांची असली पाहिजे. धर्म मार्तंड किंवा धर्मगुरूंनी त्यांना आपापल्या धर्माचे सांस्कृतिक जीवन जसे असले पाहिजे असे वाटते तसे त्यांनी त्याचे जरूर पालन करावे परंतु त्याचे बंधन त्या त्या धर्मातील लोकांवर लादता कामा नये, असे झाले तरच व्यक्तीचे सांस्कृतिक स्वातंत्र्य हिरावून घेतल्या जाणार नाही.
बंधन म्हणजेच गुलामी होय. मग ते आर्थिक बंधन सामाजिक बंधन राजकीय बंधन सांस्कृतिक बंधन, कोणतेही बंधन हे शेवटी बंधन असते, बंधन म्हणजे बांधून टाकणं,म्हणजेच त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेणे होय.
धर्म हा माणसाला मुक्ती देण्यासाठी आहे, बंधन मुक्ती. बंधन मुक्ती म्हणजेच स्वातंत्र्य आणि बंधन म्हणजेच गुलामी होय, यासाठी धर्माची सांस्कृतिक गुलामी ही सुद्धा स्वातंत्र्य हिरावून घेणारीच आहे. हे धर्माचे काम नव्हे, तर स्वार्थी माणसाचे काम आहे, स्वतःची सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा टिकविण्यासाठी केलेली ही धडपड आहे, असेच म्हणावे लागेल. आज बाबासाहेबांनी माणसाला धर्माच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी मनुस्मृती जाळली आणि माणसाला त्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य देण्यासाठी भारतीय संविधान निर्माण केले, याची पदोपदी प्रत्येक भारतीयास आम्ही भारतीय लोक म्हणून आठवण येणे जरुरीचे आहे.


