शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
भाजपा प्रणीत केंद्र सरकार पेट्रोल,डिझेल व गॅस सिलेंडर चे दर झपाट्याने वाढवीत आहे.या दरवाढीवर महाराष्ट्र सरकार बोलायला तयार नाही.
याचबरोबर पेट्रोल,डिझेल,गॅस सिलेंडर च्या तुटवड्यामुळे सर्व नागरिक व शेतकरी परेशान व चिंताग्रस्त झाले आहेत.
पेट्रोल व डिझेल च्या तुटवड्यामुळे महत्त्वपूर्ण कामांसाठी आवागमन करायचे कशे? शेतीची मशागत करायची कशी? हा यक्ष प्रश्न सर्व नागरिकांना पडला आहे.
तद्वतच गॅस सिलेंडर च्या तुटवड्यामुळे गृहिणी परेशान झालेल्या असून गॅस सिलेंडर ग्राहक केंद्र सरकार च्या चुकीच्या कारभारामुळे हैराण झाले आहेत.
भाजपा प्रणीत केंद्र सरकारला सर्व नागरिकांच्या हिताचे नियोजन करता येत नाही,हे पेट्रोल,डिझेल,गॅस सिलेंडर च्या तुटवड्यामुळे लक्षात आले आहे.
यामुळे चिमूर तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक २९/०५/२०२६,रोज शुक्रवार ला सकाळी १० वाजताच्या दरम्यान हजारे पेट्रोल पंपाजवळील चौरस्त्यावर,पेट्रोल,डिझेल,गॅस सिलेंडर च्या तुटवड्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत व केंद्र सरकारचा निषेध करण्यात येणार आहे.
चिमूर तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने होणाऱ्या निदर्शने व निषेध कार्यक्रमास सर्व जिल्हा परिषद सर्कलच्या सर्व कार्यकर्ते,चिमूर नगर परिषद सदस्य,भिसी नगरपंचायत सदस्य,चिमूर शहर पदाधिकारी,जेष्ठ काँग्रेस पदाधिकारी,चिमूर तालुका काँग्रेस पदाधिकारी,तालुका महिला काँग्रेस पदाधिकारी,तालुका युवक काँग्रेस पदाधिकारी,माजी जिल्हा परिषद सदस्य,माजी पंचायत समिती सदस्य सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी व पक्ष कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती डॉ.विजय गावंडे पाटील अध्यक्ष,तालुका काँग्रेस कमिटी,चिमूर यांनी केली आहे.



