उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
अनुसूचित जाती व जमातीच्या मतदारांना,”मतांसाठी धमकवता येत नाही किंवा दबाव टाकता येत,असे कृत्य किंवा कृती कोणत्या राजकीय पक्षांचे उमेदवारांनी,नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी केली असेल व करीत असतील तर त्यांच्या विरोधात संबंधित पोलीस स्टेशन मध्ये,”अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली पाहिजे..
संबंधित ठाणेदार अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यास राजकीय दबातंर्गत नकारात्मक भुमिका घेत असल्यास त्यांच्या विरोधात पोलीस अधीक्षक व पोलीस उप-अधीक्षक यांच्या कडे तक्रार दाखल केली पाहिजे.
याचबरोबर इतर समाजातील मतदारांनी सुध्दा राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या,नेत्यांच्या,कार्यकर्त्यांच्या धमकीला घाबरु नये.इतर समाजातील मतदार सुध्दा मतांसाठी धमकी देणाऱ्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करु शकतात.
कुठल्याही सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदारांना धमकवता येत नाही.यामुळे मत देण्यासाठी धमकावणाऱ्या उमेदवारांना,नेत्यांना,कार्यकर्त्यांना वठणीवर आणण्याची जबाबदारी न घाबरता,न डगमगता मतदारांनी पार पाडली पाहिजे.नव्हेतर अशा मुजोरी व निच प्रवृत्तीच्या उमेदवारांना निवडून न देता वठणीवर आणले पाहिजे.
भितीमुक्त वातावरणात,पारदर्शक,निष्पक्ष तथा स्वतंत्रपणे निवडणूका पार पाडण्याची नैतिक जबाबदारी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी,पोलिस अधिकारी,उमेदवार,राजकीय पक्षांच्या नेत्यांची-कार्यकर्त्यांची आहे.
कायदेशीर जबाबदारी नुसार राजकीय पक्षाचे उमेदवार,नेते,कार्यकर्ते,निवडणूक निर्णय अधिकारी,पोलिस अधिकारी वर्तन करीत नसतील तर त्यांनाही कायदेशीर पध्दतीनेच मतदारांनी धडा शिकविला पाहिजे.यासाठी मतदारांनी न हिचकता पुढे आले पाहिजे.
सार्वत्रिक निवडणूक ही कोणत्याही पक्षाची,पक्षाच्या उमेदवारांची,पक्षांच्या नेत्यांची-कार्यकर्त्यांची,अधिकाऱ्यांची बटलीक नाही तर लोकांसाठी लोकनियुक्त प्रतिनिधी निवडून देण्यासाठी असते..
यामुळे अधिकाऱ्यांनी व उमेदवारांनी निष्पक्ष कर्तव्य पार पाडावे अशी कायदेशीर परिभाषा सार्वत्रिक निवडणुकांची आहे…
सार्वत्रिक निवडणूक काळात निष्पक्ष कर्तव्याला अधिकारी व उमेदवार हरताळ फासत असतील तर त्यांच्या विरोधात मतदारांनी वेळीच हरकत घेतली पाहिजे आणि त्यांना तुम्ही लोकशाहीचे,तुमच्या पदाचे,मतदारांचे,रक्षण करण्यासाठी आहात हे त्यांना ठणकावून सांगितले पाहिजे.
उमेदवारांची,अधिकाऱ्यांची मतदारांनी अजिबात भिती ठेवू नये.त्यांची भिती मतदारांनी एकदाची मनातून काढली की अधिकारी आणि उमेदवार आणि त्यांचे नेते स्वतःहून जाग्यावर येतात याची जाणीव मतदारांना असली पाहिजे…



