Home Maharashtra गडचिरोली बाहेरून रिंग रोड हवा,इंदिरा चौकात फ्लाय ओव्हर बांधा… — अखिल...

गडचिरोली बाहेरून रिंग रोड हवा,इंदिरा चौकात फ्लाय ओव्हर बांधा… — अखिल भारतीय रिपिब्लकन पक्षाची मागणी…

दिक्षा कऱ्हाडे 

  वृत्त संपादिका 

गडचिरोली- गडचिरोली शहरातील दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक व त्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता अवजड वाहनांसाठी शहरा बाहेरून आऊटर रिंग रोड बांधण्यात यावा तसेच फ्लाय ओव्हरचे सुद्धा बांधकाम करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय रिपिब्लकन पक्षाने केली आहे.

      मागील काही वर्षांपासून गडचिरोली शहरात वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.त्यातच अवजड वाहनांची वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणात शहरातूनच होत असल्याने वाहतुकीची कोंडी झालेली आहे.

        गंभीर आजारी रुग्णांना रुग्णालयात घेऊन जातांना अतिशय विलंब होतो.तसेच वाढत्या वाहतुकी मुळे वाहन धारकांना खोळंबून राहावे लागते. या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे,याकडे पक्षाने लक्ष वेधले आहे.

       ही वाहतूक कोंडी थांबविण्यासाठी शहरा बाहेरून रिंग रोड बंधने अनिवार्य झाले आहे.तसेच मुख्य चौक असलेल्या इंदिरा चौकातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी चामोर्शी मार्गावरील सायन्स कॉलेज ते आरमोरी मार्गावरील फॉरेस्ट नाका आणि धानोरा रोड वरील सिटी हार्ट हॉटेल ते चंद्रपूर रोड वरील न्यायालय चौका पर्यंत फ्लाय ओव्हर बांधण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे.

      ही मागणी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे,प्रदेश सचीव प्राचार्य प्रकाश दुधे,शहर अध्यक्ष अनिल बारसागडे यांचेसह अन्य पदाधिकारी सुरेखाताई बारसागडे,प्रदीप भैसारे,सुखदेव वासनिक,नीता सहारे,ज्योती उंदीरवाडे,वनमाला झाडे,ज्योती चौधरी,कल्पना रामटेके साईनाथ गोडबोले,आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.