प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
कुठल्याही सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कुठलाही पक्ष,त्या पक्षाचे उमेदवार किंवा अपक्ष उमेदवार प्रभावी राहात नाही तर मतदार प्रभावी राहतात हे मतदारांनी समजून घेतले पाहिजे.
सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्व पक्षाचे नेते,उमेदवार,अपक्ष उमेदवार हे मतदारांच्या दारात प्रत्यक्ष किंवा आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जातात व त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याची विनंती करतात.
याचबरोबर अपक्ष उमेदवार सुध्दा निवडून देण्याचे मतदारांना आवाहन करतात आणि विनंती सुध्दा करतात.
मतदार हे राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना,प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांना व अपक्ष उमेदवारांना स्वतःच्या मताद्वारे निवडून देण्याचे काम करतात,लोकसेवक म्हणजेच लोकप्रतिनिधी बनवतात.
यामुळेचे मतदार हे राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांपेक्षा-नेत्यांपेक्षा प्रभावी व ताकतवर असतात हे मतदारांनी समजून घेतले पाहिजे.
राष्ट्र निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशातील सर्व प्रोढ नागरिकांना व सर्व प्रोढ महिलांना मताचा अधिकार जो दिला,”तो,” भुलथापा देणाऱ्या व धोखाधाडी करणाऱ्या आणि देशातील नागरिकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणाऱ्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी!
दुसऱ्या पद्धतीने सांगायचे झाल्यास स्वतःचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आणि स्वतःचे सर्वोतोपरी सर्वोत्तम संरक्षण करण्यासाठी,स्वतःची सर्वोतोपरी उन्नती करण्यासाठी मताचा अधिकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्व प्रोढ नागरिकांना व सर्व प्रोढ महिलांना दिला आहे.
तिसरे असे की,भारत देशातील ओबीसी,एससी,एसटी, अल्पसंख्याक,एन्टी व्हिजेन्टी,आणि इतर बहुजन समाजातील नागरिकांना व महिलांना मताचा अधिकार जो डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वारे मिळाला आहे तो जातीचे व धर्माचे राजकारण करण्यासाठी नव्हे तर होतकरू,गरीब,कर्तव्यदक्ष,संवेदनशील,कार्यक्षम उमेदवारांना प्राधान्याने निवडून देण्यासाठी व स्वसमाजाची आणि इतर नागरिकांची उन्नती करण्यासाठी!..
चौथे असे की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशातील सर्व नागरिकांना व सर्व महिलांना मताचा अधिकार यासाठी दिला की,”तुमच्या समाजातील युवक,बेरोजगार,विद्यार्थी हे या देशाचे मालक-चालक बनावे,सुत्रधार बनावे,उधोजक बनावे,शासकीय संस्थांचे प्रमुख बनावे,बिना रुपयांनी अधिकारी व कर्मचारी बनावे,खासदार व आमदार बनावे,स्वाभिमानाने या देशातील सर्व नागरिकांना व महिलांना जगता यावे,स्वतःच्या पायावर उभे राहता यावे,शेतकरी म्हणून शासनाला आपल्या काबूत ठेवता यावे,सर्व समाजातील महिलांच्या व पुरुषांच्या,युवतीच्या व युवकांच्या इज्जतीचे धिंडवडे कुणी काढू नये,तुम्हाला कुणाच्या पुढे हात पसरण्याची वेळ येवू नये…
परंतु स्वतःला लायक समजणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनी व प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी (सत्ता भोगलेल्या व लाचार नेत्यांनी) चुकीच्या कार्यपद्धतीला अनुसरून किंवा धोरणांतर्गत या देशातील नागरिकांना व महिलांना सक्षम,कार्यक्षम,जागरुक,सतर्क, कर्तव्यदक्ष,समजदार,शिक्षित-उच्चशिक्षित बनवण्यापेक्षा कमकुवत बनवून ठेवले,लाचार करुन ठेवले असे दिसून येते आहे.
याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे निवडणूक पुर्व किंवा निवडणूक दरम्यान मतदार पुरुषांना व महिलांना रुपये देऊन मत मागणे होय.हा मतदारांना प्रलोभनांच्या माध्यमातून लाचार व शक्तीहिन करण्याचा प्रयत्न आणि प्रकार होय,त्यांना सदैव दुर्बल करुन ठेवण्याचे छडयंत्र होय…
यामुळे नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका दरम्यान मतदानाला सामोरे जाताना महाराष्ट्र राज्यातील मतदारांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे व रुपयांच्या प्रलोभनाला बळी न पडता आपल्या मताची किंमत व स्वतःची शक्ती ओळखून योग्य उमेदवाराला निवडून दिले पाहिजे.
सत्तेच्या बाजारातंर्गत नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांना अनुसरून स्वतःला म्हणजे स्वतःच्या मताला न विकता मतदारांनी मत प्रक्रिया निष्पक्ष पार पाडली पाहिजे असे म्हणणे उचित आहे.
म्हणूनच मताची व मतदारांची ताकद व शक्ती बघता मतदार हे राष्ट्रीय पक्षांपेक्षा,त्यांच्या नेत्यांपेक्षा व प्रादेशिक पक्षांपेक्षा,त्यांच्या नेत्यांपेक्षा निवडणूक काळात प्रभावी व ताकतवर ठरतात हे स्पष्ट आहे..
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्वसामान्य नागरिकांना/महिलांना मताधिकाराच्या माध्यमातून दिलेली शक्ती अनन्यसाधारण आहे.
ज्या दिवशी मतदार हे स्वतःच्या मताची किंमत व ताकद ओळखतील त्यादिवसांपासून सत्ताधारी हे मतदारांच्या अधिकारांना पायदळी तुडवीणार नाही,त्यांना दुर्बल करणार नाही,त्यांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष करणार नाही,त्यांना सक्षम होण्यापासून रोखणार नाही हे वास्तव आहे.
पण,मतदार केव्हा स्वतःला व स्वतःच्या मताला समजून घेणार व निवडणूक काळात केव्हा रुपयांना नाकारणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे…


