बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
इंदापूरचा चेहरा मोहरा उत्तर बदलणे हा आमचा संकल्प आणि जबाबदारी. टीका-टिप्पणींना देण्यात वेळ दवडणार नाही. आम्ही विकास केला आहे, करीत आहोत आणि पुढील चार वर्षे तालुक्याचा आमदार म्हणून आणखी मोठी कामगिरी करणार आहोत. इंदापूरच्या प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा आणि सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करा, असे आवाहन – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
यावेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते डॉ.शशिकांत तरंगे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, उज्ज्वला चौगुले, सुधीर मखरे, अशोक इजगुडे, प्रतापराव पाटील, दत्तात्रय घोगरे उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत महात्मा फुले नगर व दर्गा मजीद चौकात भरणे यांनी विरोधकांना उत्तर देत विकासाची यादीच मांडली.
शहराची मान उंचावली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा म्हणाले, विरोधक म्हणतात कचऱ्यातून पैसा कमावला. हो, कमावलाच पण स्वतःसाठी नव्हे तर नगरपालिकेसाठी कचऱ्यावर प्रक्रिया करून उत्पन्न वाढवलं. इंदापूर शहर कचरा कुंडीमुक्त केले.
माजी नगराध्यक्ष अंकिता शहा यांच्या कार्याचे कौतुक…
मागील पाच वर्षांत माजी नगराध्यक्ष अंकिता शहा आणि त्यांच्या टीमने इंदापूर शहराला नवी ऊर्जा दिली. भुयार गटार, ड्रेनेज, पालिकेची नवी इमारतया साठी मी १० कोटींचा निधी दिला. स्पर्धा परीक्षेची ५ कोटींची अद्ययावत लायब्ररी दिली. ऊर्जा प्रकल्प, शॉपिंग कॉम्प्लेक्स, तलाव विकास, बाबा चौक स्मशानभूमी रस्ता, दर्गा शिवली संवर्धन ही सर्व कामे राष्ट्रवादीच्या खांद्यावर उभी आहेत. सत्ता हातात असताना विकासाचा एकही पत्ता दाखवू न शकणारे आता मोठ्या आवाजात बोलतात. इंदापूरकरांनी शांत राहून विचार करा. विकास दिसतोय तो कुणाचा? उत्तर स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा, असा जोरदार टोला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लगावला.
त्याबदल्यात स्वच्छतेचे तब्बल २२ कोटींचे पारितोषिक मिळवले. हे काम विरोधकांच्या काळात का झाले नाही? शहा कुटुंब इंदापूरकरांसाठी नेहमी उभे राहिले. परंतु मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दाखवलेला विश्वास माझ्यासाठी सर्वात महत्वाचा. तुम्ही आम्हाला संधी दिल्यास त्या संधीचे सोने करून दाखवू, अशी ही ग्वाही भरत शहा यांनी दिली.



