Home Political शहराची प्रगती होणार असेल तर भरत शहा सारखा चांगला व्यक्ती नगराध्यक्ष पदाचा...

शहराची प्रगती होणार असेल तर भरत शहा सारखा चांगला व्यक्ती नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून तुमच्यासमोर उभा :- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे…

 बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

      राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांना आपण जर साथ दिली मतदान रुपी आशीर्वाद दिला तर निश्चित प्रकारे शहराचा चेहरा भविष्यामध्ये बदलणार आहे. आपल्या गल्लीची, वार्डची व शहराची प्रगती होणार असेल तर भरत शहा सारखा चांगला व्यक्ती नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून तुमच्यासमोर उभे आहेत.

      त्यांच्या परिवारातील गोकुळशेठ शहा व इतर सदस्य यांनी या शहरासाठी खूप काही केलेले आहे. तसेच इंदापूर शहरातील इतर कुटुंबीयांचे शहराच्या विकासासाठी योगदान लाभलेले आहे. इंदापूर तालुक्याला जे जे नेते लाभले त्या सर्व नेत्यांचे या कुटुंबाला सहकार्य लाभले व या कुटुंबाचे त्यांना सहकार्याची भूमिका राहिली. खूप मोठा त्याग या कुटुंबांनी या शहरासाठी केलेला आहे. म्हणून निश्चित प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे.

         सुंदर व स्वच्छ शहर आणि चांगलं शहर करण्यासाठी आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा, व इतर नगरसेवक पदाचे उमेदवार यांना चांगल्या प्रकारचे मतदान करावे अशी विनंती करतो असे आवाहन मंत्री भरणे यांनी केले..

      तसेच मागील पाच वर्षाच्या कालखंडामध्ये नगराध्यक्ष अंकिता शहा यांनी शहराच्या विकास कामासाठी प्रयत्न केले. त्यावेळी पक्ष बाजूला ठेवून आम्हीही विकास कामांना निधी दिला. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या आणि शहरातील व्यापारी संघाचे अध्यक्ष या नात्याने भरत शहा यांनी केलेल्या मागणीनुसार मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रला जोडणाऱ्या कुगाव ते शिरसोडी या पुलासाठी ३८२ कोटी रुपयांचा निधी दिला.

       या पुलामुळे आगामी काळात शहरातील बाजारपेठ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याचा सर्व फायदा इंदापूरकरांना होणार आहे असे भरणे यांनी इंदापूर येथे भरत शहा व मित्र परिवाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश सोहळ्याप्रसंगी आपले मत व्यक्त केले.

        इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश (दि. १६ नोव्हेंबर) रोजी केला.

       यावेळी कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूर नगरपरिषदत निवडणूकसाठी नगराध्यक्ष पदासाठी भरत शहा श्री. भरतशेठ शहा व मित्र परिवार यांचा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जाहीर पक्ष प्रवेश रवि दि. 16/11/2005 रोजी सायं वा यांच्या उमेदवाराची घोषणा केली.

          याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, पक्षाचे राज्य प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष शैलेश पवार, अर्बन बँकेचे माजी चेअरमन देवराज जाधव, मोळकर शिक्षण संस्थेचे वसंत मोहोळकर, मधुकर भरणे, सचिन सपकळ, शिवाजी तरंगे, मुकुंद शहा, माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, माझी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, पोपट शिंदे यांच्यासह पक्षाचे आजी-माजी नगरसेवक कार्यकर्ते तसेच भरत शहा यांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         केल्यानंतर भरत शहा म्हणाले की, शहा परिवारावर इंदापूरच्या जनतेचे प्रेम असून मागील पंचवार्षिक मध्ये केलेल्या या विकास कामांची पावती मतदानातून जनता नक्की देईल.

         तसेच ते पुढे म्हणाले की, आमचे पैसे कष्टाचे आहेत. वाममार्गाने आलेले नाहीत. आमच्याकडे शहराच्या विकासाचे व्हिजन आहे. शहराचा विकास करीत असताना बाजारपेठेसह इतर काही समस्या सोडवायच्या राहिल्या आहेत. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहे.