Home Political आळंदी शहराच्या विकासासाठी भाजपचे प्रशांत कुऱ्हाडेंना विविध संघटनांचा मोठा पाठिंबा…

आळंदी शहराच्या विकासासाठी भाजपचे प्रशांत कुऱ्हाडेंना विविध संघटनांचा मोठा पाठिंबा…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी – आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रशांत कुऱ्हाडे यांना आज विविध सामाजिक, आंबेडकरी आणि बौद्ध संघटनांकडून जाहीर पाठिंबा मिळाला. या पाठींब्यामुळे भाजपच्या प्रचाराला मोठी गती मिळून निवडणुकीचे समीकरण बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

         कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा नेते विश्वनाथ थोरात, भारतीय बौद्ध महासभेचे आळंदी शहराध्यक्ष संदीप रंधवे, तसेच आंबेडकरी चळवळीतील भिमराव थोरात, प्रविण रंधवे, सुभाष भोसले, माऊली कांबळे, प्रभानंद शेलार यांनी आपला पाठींबा जाहीर केला.

       युवकांचाही मोठा उत्स्फूर्त सहभाग दिसला. सिद्धार्थ ग्रुपचे विश्वजित थोरात, रवि रंधवे, हर्षल थोरात, अक्षय रंधवे यांच्यासह पंकज शिंदे, गौरव गिलबिले, श्रेयस रणदिवे, शुभम धुर्वे, प्रियेश सोनवणे, दिनेश थोरात आदींनी एकत्र येत प्रशांत कुऱ्हाडे यांना विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची भूमिका मांडली.

       महिला बांधवांकडूनही महत्त्वाचा पाठींबा जाहीर झाला. हिरकणीताई धुर्वे, ऋतुजा रंधवे, वैष्णवी रणदिवे, राधिका धुर्वे, ऋषिका धुर्वे, आरती धुर्वे यांनी या निवडणुकीत सक्रिय योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.

एकदिलाने पाठिंबा जाहीर करणाऱ्या संघटना…

समस्त बौद्धजन बांधव

माता रमाई महिला मंडळ

भारतीय बौद्ध महासभा

सिद्धार्थ ग्रुप

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

पंचशील मित्र मंडळ

अस्तित्व प्रतिष्ठान

        या सर्व संघटनांनी घराघरात जाऊन जनसंपर्क वाढवण्याचे आणि विकासाभिमुख नेतृत्वाला साथ देण्याचे ठरवले आहे.

कुऱ्हाडे यांची प्रतिक्रिया

“आळंदी शहराचा सर्वांगीण विकास, सुशासन आणि सर्वसमावेशक प्रगती हेच माझे ध्येय आहे. विविध समाजघटकांचा मिळणारा पाठींबा हीच माझी ताकद आहे,” अशी प्रतिक्रिया प्रशांत कुऱ्हाडे यांनी दिली. निवडणूक जवळ येत असताना मिळत असलेला व्यापक पाठिंबा पाहता भाजपच्या प्रचाराला नवे बळ मिळत असून आगामी काही दिवसांत प्रचार अधिक वेगात होणार असल्याचे दिसून येत आहे.