शुभम गजभिये..
विशेष प्रतिनिधी..
चिमूर तालुकांतर्गत मौजा वडसी या गावातील करिष्मा अनिरुध्द मेश्राम हीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले असून सहाय्यक वन – संरक्षक या पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे.
राज्यातील अनुसूचित जातीतील महिलांमध्ये प्रथम क्रमांकाने करिष्मा मेश्राम पात्र ठरली आहे.तिच्या या उल्लेखनीय यशाचे कौतुक करणे आवश्यक होते.
म्हणूनच मौजा वडसी गावातील नागरिकांसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जुनेद खान,सुधीरपंदीलवार,प्रशांत बोबडे,बब्बू खान,श्रीकांत गेडाम,सरपंच अन्नपूर्णा मांदाळे,वनिता रामटेके,रवींद्र मेश्राम,भक्तदास मेश्राम,अनिरुद्ध मेश्राम,यांनी करिष्मा मेश्राम यांच्या यशाबद्दल कौतुक केले व त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.
याप्रसंगी गावकरी उपस्थित होते.



