दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मोठी राजकीय हालचाल घडली आहे. नगराध्यक्ष पदासाठी तब्बल पाच उमेदवारांनी, तर नगरसेवक पदासाठी तब्बल ४५ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले आहेत. या मोठ्या माघारीमुळे विविध प्रभागांतील लढतींचे गणित पूर्णपणे बदलले असून काही ठिकाणी तिढा निर्मान झाला तर काही प्रभागांत सरळ लढती निश्चित झाल्या आहेत.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ८अ मधून भाजपच्या सुजाता तापकीर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या प्रभागातील सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने सुजाता तापकीर यांचा विजय पक्का झाला आहे.
नगराध्यक्ष पदासाठी माघार घेतलेले उमेदवार..
घुंडरे तुषार अरुण
चोरडिया सतिश कांतीलाल
चौधरी राजाराम रतन
तापकीर ज्ञानेश्वर सुरेश
येळवंडे किरण रामभाऊ
दहा प्रभागांतील माघार घेतलेल्या उमेदवारांची संपूर्ण यादी..
प्रभाग १अ
कवितके लक्ष्मीबाई मारुती
घुंडरे प्राजक्ता नितीन
प्रभाग १ब
घुंडरे सुनील ज्ञानेश्वर
प्रभाग २अ
ऋतुजा रंधवे
ज्ञानेश्वरी उमरगेकर
सुजाता रंधवे
प्रभाग २ब
भोसले अभिषेक रामचंद्र
भोसले संतोष मोहन
सय्यद निसार मोहम्मद
प्रभाग ३अ
कुऱ्हाडे वंदना सोमनाथ
वाघमारे अभिलाषा संकेत
शिर्के किरण रवींद्र
शिर्के वैशाली संजय
प्रभाग ४अ
पाचुंदे पूजा विकास
पांचाळ आश्विनी रोहित
प्रभाग ४ब
कुऱ्हाडे मनोज तानाजी
गायकवाड गौरव विठ्ठल
येळवंडे किरण रामभाऊ
वहिले राजेश नारायण
प्रभाग ५अ
कुऱ्हाडे अक्षदा रोहन
बोरुंदिया शिल्पा सागर
प्रभाग ५ब
बनसोडे ज्ञानेश्वर विष्णू
प्रभाग ६अ
कुऱ्हाडे तृप्ती महेश
पोफळे मोक्षदा शंतनू
प्रभाग ६ब
कुऱ्हाडे समिर आप्पासाहेब
गोगावले रमेश बबनराव
प्रभाग ७अ
घुंडरे ज्योती अक्षय
तुर्की शांभवी वासुदेव
प्रभाग ७ब
घुंडरे विवेक ज्ञानेश्वर
प्रभाग ८ब
गिलबिले चैत्राली सचिन
बोत्रे सविता राजेंद्र
रहाणे प्रमिला गणेश
प्रभाग ९अ
तापकीर नम्रता पद्माकर
तापकीर पुजा आशीष
तापकीर सीमा रामेश्वर
शिंदे कन्याकुमारी विश्वंभर
प्रभाग ९ब
बवले गुरुनाथ प्रभाकर
प्रभाग १०अ
वेळकर मंगला रघुनाथ
प्रभाग १०ब
काळे उज्वला दीपक
प्रभाग १०क
काळे प्रज्ञा सचिन
काळे सुवर्णा दत्तात्रय
चोरडिया माधवी राहुल
तापकीर सोनाली ज्ञानेश्वर
तापकीर आरती सुरेश
लांडगे शोभा जालिंदर
निवडणूक प्रक्रियेच्या निर्णायक टप्प्यात झालेल्या या मोठ्या माघारींमुळे आळंदीतील राजकीय वातावरण तापले आहे. अनेक प्रभागांमध्ये अंतिम सामना स्पष्ट झाल्याने पुढील काही दिवसांत प्रचार अधिक रंगात येणार असून विविध पक्षांच्या रणनीतींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.



