Home Political आळंदी नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार रिंगणात… — दहा...

आळंदी नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार रिंगणात… — दहा प्रभागांतील वैध अर्ज जाहीर…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर नगराध्यक्षपदासह दहा प्रभागांतील सर्व वैध उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. नगराध्यक्षपदासाठी दिग्गजांसह नव्या उमेदवारांची नोंद झाल्याने आळंदीतील राजकीय वातावरण तापले आहे. अडथळे, टिकाटिप्पणी आणि पक्षांतील अंतर्गत चर्चांना मागे टाकत अनेकांनी अंतिम क्षणी अर्ज दाखल केल्याचे चित्र दिसले.

नगराध्यक्षपदासाठी एकूण नऊ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून प्रमुख नामावली अशी….

        कुऱ्हाडे प्रकाश पंढरीनाथ, कुऱ्हाडे प्रशांत पोपट, घुंडरे तुषार अरुण, चोरडिया सतिश कांतीलाल, चौधरी राजाराम रतन, डरपे उमेश भागिरथ, तापकीर ज्ञानेश्वर सुरेश, दौंडकर सुरेश वामनराव आणि येळवंडे किरण रामभाऊ.

        या पदासाठी अनेक अनुभवी नेते, घराणेशाहीचे प्रतिनिधी तसेच नवोदित उमेदवार एकत्र रिंगणात उतरल्यानं शहरात चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकीत सरळ सामना होणार की बहुकोनी स्पर्धा, याकडे आळंदीकरांचे विशेष लक्ष आहे.

दहा प्रभागांतील वैध उमेदवारांची संपूर्ण यादी….

प्रभाग १अ…

कवितके लक्ष्मीबाई मारुती, घोळवे प्रियंका युवराज, घुंडरे ऋतुजा आदित्य, घुंडरे ज्योती अक्षय, घुंडरे प्राजक्ता नितीन, घुंडरे भाग्यश्री राम.

प्रभाग १ब…

घुंडरे आदित्य हनुमंत, घुंडरे सचिन रामकृष्ण, घुंडरे सुनील ज्ञानेश्वर.

प्रभाग २अ…

उमरगेकर वैजयंता अशोक, उमरगेकर ज्ञानेश्वरी अशोक, नेटके अनुपमा तुकाराम, नेटके योगिता तुषार, नेटके सोनू अनंता, रंधवे ऋतुजा अक्षय, रंधवे सुजाता प्रविण.

प्रभाग २ब…

भोसले अभिषेक रामचंद्र, भोसले रामचंद्र दत्तात्रय, भोसले सागर तुळशीराम, भोसले संतोष मोहन, सय्यद निसार मोहम्मद.

प्रभाग ३अ…

कुऱ्हाडे वंदना सोमनाथ, गोगावले आशा आशिष, घुंडरे पूजा संजय, वाघमारे अभिलाषा संकेत, शिर्के किरण रवींद्र, शिर्के वैशाली संजय.

प्रभाग ३ब…

कुऱ्हाडे योगेंद्र गोपाळ, कुऱ्हाडे सोमनाथ कुंडलिक.

प्रभाग ४अ…

कुऱ्हाडे पुजा अनिकेत, धुर्वे हिरकनी सुदाम, पाचुंदे पुजा विकास, पांचाळ आश्विनी रोहित, येळवंडे कांचन किरण.

प्रभाग ४ब…

काशिद सुजित बबन, कुऱ्हाडे मनोज तानाजी, कुऱ्हाडे योगेश चंद्रकांत, कुऱ्हाडे सागर निवृत्ती, गायकवाड गौरव विठ्ठल, येळवंडे किरण रामभाऊ, वहिले राजेश नारायण, सोळंकर सचिन पंढरीनाथ.

प्रभाग ५अ…

कुऱ्हाडे अक्षदा रोहन, कुऱ्हाडे कांचन उमेश, बोरुंदिया खुशी सागर, बोरुंदिया शिल्पा सागर.

प्रभाग ५ब…

कुऱ्हाडे रोहन नंदकुमार, बनसोडे ज्ञानेश्वर विष्णू, रासकर संतोष मारुती.

प्रभाग ६अ…

कुऱ्हाडे तृप्ती महेश, कुऱ्हाडे साक्षी अक्षय, पोफळे मोक्षदा शंतनू, वाघमारे लतिका ज्ञानेश्वर.

प्रभाग ६ब…

कारेकर शिरीष शिवाजी, कुऱ्हाडे समिर आप्पासाहेब, कुऱ्हाडे हेमंत गुलाबराव, गोगावले रमेश बबनराव, बोराटे प्रसाद सुभाष, रंधवे रविंद्र राहुल.

प्रभाग ७अ..

गरुड योगिता सुदीप, घुंडरे अरुणा ज्ञानेश्वर, चिताळकर पाटील ज्योती राहुल, घुंडरे ज्योती अक्षय, तुर्की शांभवी वासुदेव, वीर तेजस्वी ज्ञानेश्वर.

प्रभाग ७ब…

गुळंजकर ज्ञानेश्वर मच्छिंद्र, घुंडरे विवेक ज्ञानेश्वर, घुंडरे सुनील ज्ञानेश्वर.

प्रभाग ८अ….

गिलबिले चैत्राली सचिन, तापकीर सुजाता कालिदास, बोत्रे सविता राजेंद्र, रहाणे प्रमिला गणेश.

प्रभाग ८ब…

आवटे भागवत नारायण, कवडे रामप्रसाद सोपान, गिलबिले सचिन रामदास.

प्रभाग ९अ…

चांदगुडे सुनंदा रामचंद्र, बवले अलका ज्ञानेश्वर, तापकीर अर्चना विजय, तापकीर नम्रता पद्माकर, तापकीर पुजा आशीष, तापकीर सिमा रामेश्वर, शिंदे कन्याकुमारी विश्वंभर.

प्रभाग ९ब…

केकाण अमोल गंगाराम, घुले दिनेश रामदास, बवले गुरुनाथ प्रभाकर, वहिले पांडुरंग प्रभाकर.

प्रभाग १०अ….

        कांबळे ज्ञानेश्वर सुधाकर, दुनघव सुहास शेषराव, वाघमारे ज्ञानेश्वर प्रकाश, वेळकर मंगला रघुनाथ, सोनवणे प्रियेश प्रफुल, सोनवणे संतोष लक्ष्मण, झोंबाडे सुरेश खंडेराव.

प्रभाग १०ब…

        काळे उज्वला दिपक, गडदे आशा अमित, चव्हाण संगीता राहुल, चोरडीया माधवी राहुल, तापकीर आरती सुरेश, तापकीर ऋतुजा अनिकेत.

प्रभाग १०क…

         काळे उज्वला दिपक, काळे प्रज्ञा सचिन, काळे सुवर्णा दत्तात्रय, चोरडिया माधवी राहुल, तापकीर सोनाली ज्ञानेश्वर, तापकीर आरती सुरेश, तापकीर शैला अविनाश, तापकीर सोनाली सचिन, लांडगे शोभा जालिंदर.

निवडणुकीची रंगत वाढली…

         प्रभागनिहाय उमेदवारांच्या मोठ्या यादीत स्थानिक घराणी, अनेक नवोदित, महिला उमेदवारांची मोठी उपस्थिती आणि एकाच आडनावाचे अनेक दावेदार दिसत असल्याने प्रत्येक प्रभागात स्पर्धा चुरशीची होणार आहे. आगामी माघारीचा टप्पा, पक्षीय धोरणे आणि प्रचार मोहीम सुरू होताच आळंदीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.