Home कृषी केळी उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून आर्थिक लूट; कमी दराने खरेदीमुळे शेतकरी अडचणीच्या संकटात...

केळी उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून आर्थिक लूट; कमी दराने खरेदीमुळे शेतकरी अडचणीच्या संकटात तर,उत्पादन खर्चही वसूल होईल शेतकरी मेटाकोटी…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

       इंदापूर तालुक्यात नीरा आणि भीमा नदीच्या खोऱ्यात केळी उत्पन्नात वाढ झाल्यामुळे केळी पिकाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. व्यापाऱ्यांकडून कमी दराने खरेदी झाल्यामुळे शेतकरी हातबल झाला आहे.

          केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. कष्टाने पिकवलेली केळी व्यापाऱ्यांकडून अत्यंत कमी दरात घेतली जात असल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे. उत्पादन खर्च, मजुरी, खते, वाहतूक या सर्व गोष्टींचे दर वाढले असतानाही बाजारात केळीस योग्य भाव मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

          शेतकऱ्यांच्या मते, खरेदीदार व्यापारी आणि काही दलाल एकत्र येऊन मुद्दाम कमी भाव ठरवत आहेत. फक्त ३ ते ४ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

       वर्षभर मेहनत करून शेतकरी उत्पादन घेतो, पण व्यापारी हवे तसे भाव कमी करतात.सरकारने हमीभाव किंवा बाजार नियंत्रणाची ठोस व्यवस्था करावी, आशी मागणी केळी उत्पादक शेतकरी संचालक श्रीकांत बोडके या शेतकऱ्याने केली आहे.

       याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांची होत असलेली लूट थांबवावी, शासकीय नियमाचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

        दरम्यान, योग्य भाव न मिळाल्यास पुढील हंगामात केळी लागवड कमी करण्याचा इशाराही काही शेतकऱ्यांनी दिलेला आहे.तर अनेक शेतकरीनी उभे केळीचे पीकही ट्रॅक्टर यंत्राच्या साह्याने मोडून टाकण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील केळी उद्योगावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चौकट…

      राज्याचे नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याकडे लक्ष देऊन, कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा बंदोबस्त करावा.