राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात आले.या भव्य रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ.अश्विनी ताई नैताम यांनी,पक्षाच्या सर्व नगरसेवक उमेदवारांसह, मोठ्या जल्लोषात व शिस्तबद्ध पद्धतीने आपले नामांकन अर्ज दाखल केले.!
शहरातील तेली वॉर्ड पासून निघालेल्या या रॅलीत हजारो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली.ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी आणि मोठ्या जनसमर्थनासह झालेल्या या शक्तीप्रदर्शनामुळे संपूर्ण शहराचा परिसर दुमदुमून गेला.!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजितदादा पवार) उमेदवारांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता,आगामी निवडणुकीत पक्षाकडे जनतेचा कल स्पष्टपणे झुकत असल्याचे चित्र या वेळी दिसून आले.!



